Eknath Shinde : जळगावमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटचा नकार, नेमकं काय घडलं?

Jalgaon Latest News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विमानाच्या पायलटने विमान उडवण्यास नकार दिल्याने जळगावमध्ये तणावपूर्ण क्षण निर्माण झाले. चर्चा आणि समजुतीनंतर शिंदेंची मुंबईकडे उशिरा रवाना.

Eknath Shinde Jalgaon Latest News Update : शुक्रवारी रात्री जळगावमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विमान उडवण्यास पायलटने कार दिला. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईकडे रवाना होण्यास विलंब झाला.

जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विमानाच्या पायलटचा विमान उडवण्यास नकार दिल्याचे शिंदे यांना रवाना होण्यास विलंब झाला. विमानाच्या पायलटची मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून समजूत काढली.

मंत्री गिरीश महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांनी समजूत काढल्यानंतर तिन्ही पायलट यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. विमानतळावर प्रतीक्षालयात बंद द्वार पायलट यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. पायलटची समजूत काढल्यानंतर शिंदे रात्री मुंबईकडे रवाना झाले.

मुक्ताईनगर येथील दौरा आटोपून एकनाथ शिंदे विमानतळावर दाखल झाले. मात्र पायलटने विमान उडवण्यास नकार दिल्याने शिंदेंना मुंबईला जाण्यास विलंब झाला. रात्री उशिरा शिंदे मुंबईत दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com