Ladki Bahin Yajana : लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत, कारण....; महाविकास आघाडीच्या नेत्याने हिशोबच मांडला

Ladki Bahin Yajana update : महाविकास आघाडीच्या नेत्याने लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकरला लक्ष्य केलं आहे. या योजनेमुळे सरकार अडचणीत आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Ladki Bahin Yajana update
Ladki Bahin Yajana Saam tv
Published On

संजय महाजन, साम टीव्ही

लाडकी बहीण योजनेवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी इतरत्र वळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता याच मुद्द्यावरून शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत आल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

Ladki Bahin Yajana update
Raigad Accident : शिवराज्यभिषेक सोहळ्याहून परतताना भीषण अपघात; रायगडावरून परतणाऱ्या शिवप्रेमींचं वाहन उलटलं

लाडकी बहीण योजनेवरून राजकीय वर्तुळात आरोपांची मालिका सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यावरून सरकारला टीकेचा सामना करावा लागला. यावरून सत्ताधारी मंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली. आता याच मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी महायुती सरकार अडचणी आल्याची दावा केला आहे. लाडक्या बहिणीमुळे सरकार अडचणीत आलं आहे. निधी कमतरतेमुळे अनेक योजना रखडल्या आहेत. काही योजना रद्द करण्यात आल्या आहेत'.

सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर भाष्य करताना खडसे म्हणाले, 'सामाजिक विभागाचा निधी आणि मागासवर्गीय विभागाचा निधी हा टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणीच्या विभागात वाढवण्यात येत आहे. त्यामुळे या विभागाला फटका बसू शकतो. ही योजना थांबू शकतात आणि फटका बसू शकतो'.

Ladki Bahin Yajana update
Prakash Ambedkar : भारत-पाक युद्धात विजयाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या जनतेतील लोकांचा कौल आजमावण्यासाठी त्यांची चाचणी असेल. आज तरी ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र आहे. सर्वांची चर्चा करूनच शरद पवार निर्णय घेतील असं मला वाटतं'.

Ladki Bahin Yajana update
Hasan Mushrif News : ईडीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ नॉट रिचेबल, पाय आणखी खोलात? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नाशिकच्या कुंभमेळ्यावरही खडसे यांनी भाष्य केलं. 'कुंभमेळा पावणे दोन वर्षे चालावा असं सरकारचं दिसते. सरकार मात्र या कुंभमेळ्यात पैसा कुठून उभा करतोय, याची उत्सुकता लागली आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com