Raigad Accident : शिवराज्यभिषेक सोहळ्याहून परतताना भीषण अपघात; रायगडावरून परतणाऱ्या शिवप्रेमींचं वाहन उलटलं

raigad mangaon accident : शिवराज्यभिषेक सोहळ्याहून परतताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडावरून परतणाऱ्या शिवप्रेमींचं वाहन उलटून हा अपघात झाला.
raigad accident
raigad Saam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही

किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगडावरील हाच सोहळा आटोपून परतीचा प्रवास करणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. माणगावजवळील बोरवाडी गावाच्या हद्दीत अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात शिवप्रेमी गंभीर जखमी झाले आहेत.

raigad accident
Ladki bahin yojana :...तरच 'लाडकी'चा हप्ता बँक खात्यात जमा होणार; महत्वाची माहिती आली समोर, पाहा व्हिडिओ

शिवराज्याभिषेकाला संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमी येत असतात. या सोहळ्यामागे अनेकांच्या वेगवेगळ्या भावना असतात. यंदाही 352 व्या शिवराज्याभिषेकाला किल्ले रायगडावर हजारो शिवप्रेमी आले होते. रायगडावरील हा शिवराज्यभिषेकाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर शिवप्रेमी परतीच्या मार्गावर निघाले.

रायगडावरील हाच शिवराज्यभिषेक सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या शिवप्रेमींच्या एका वाहनाचा अपघात झाला. बोरवाडी गावाजवळ या शिवप्रेमींच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन शिवप्रेमींना गंभीर दुखापत झाली आहे. तर दोन शिवप्रेमी किरकोळ जखमी झाली आहे.

raigad accident
Shivrajyabhishek sohala : छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या ब्राह्मणाने केला?

अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या जखमींवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु आहेत. रायगडच्या निजापूरदरम्यान अवघड वळणावर चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर जिप रस्त्यावर उलटली. या भयंकर अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अपघातानंतर काहींनी पोलिसांना माहिती दिली. त्याचबरोबर अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

raigad accident
Bakra Eid 2025 : बकरी ईदच्या दिवशी पशूहत्यावर बंदी; दिल्ली सरकारने तातडीने घेतला मोठा निर्णय

नांदेडमध्ये भीषण अपघात

नांदेड शहरात समाजकल्याण कार्यालयासमोर दुचाकी आणि पिकपमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. तर एका जणांच्या डोक्याला मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना विष्णुपुरी येथील रुग्णालय उपचारासाठी पाठवलं. गंभीर जखमी हे दोघेही बिलोली तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com