
देशभरात ७ जून रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. या सणासाठी मुस्लिम बांधवांची तयारी सुरू आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या दिवशी गाय, उंटसह इतर प्रतिबंधित प्राण्यांचा बळी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, बळी देताना स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
दिल्लीतील मंत्री कपिल मिश्रा यांनी दिल्ली सरकारच्या मार्गदर्शक सूचना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'गाय आणि उंटाचा बळी देण्यास परवानगी नाही. या प्राण्यांचा बळी दिल्याचं आढळल्यास कायदेशीर गुन्हा मानला जाईल. फक्त निश्चित केलेल्या प्राण्यांचा बळी देण्यास परवानगी आहे. सार्वजनिक ठिकाणी बळी देण्यासही बंदी आहे. बंदी घातलेल्या प्राण्यांचा बळी देताना आढळल्यास पोलिसांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.'
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारने ही मार्गदर्शक सूचना आयुक्त, सचिव, सहआयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली आहे. बकरी ईदच्या दिवशी कायद्याचे काटेकोर पालन होण्यासाठी कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश आहेत. दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस अलर्टवर आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोवंश हत्या सहन केली जाणार नाही, असे म्हणत पोलीसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. बकरी ईदच्या दिवशी गोवंश हत्या होऊ नये यासाठी आरोपींची धरपकड सुरू आहे. पोलिसांनी काही गो तस्करांना पोलीसांनी १५ दिवसांसाठी हद्दपार केले आहे.
ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. डीसीपी निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली जात आहे. कन्हान पोलिसांनी ७० जणांची सुटका केली आहे. याप्रकरणी मोहम्मद शश्रीफ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.