Corona Update : कोरोना वाढला, मुलांना सांभाळा; पालकांनी काय खबरदारी घ्यावी? वाचा सविस्तर

Corona Update in Marathi : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता शाळकरी मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी चिंतेची बाब ठरतेय. शाळकरी मुलांनाही कोरोनाचा धोका निर्माण झालाय. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Corona news
corona Saam tv
Published On

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

उन्हाळी सुट्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत आणि त्यातच कोरोनाची पुन्हा एण्ट्री झालीय. त्यामुळे SARS-CoV-2 या व्हायरसपासून मुलांना सांभाळण्यासाठी आता शाळांबरोबरच पालकांनाही पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे. आयएमएफच्या माहितीनुसार, मुलांमध्ये कोणत्या साथीच्या रोगाचा प्रसार होतोय.. पाहूयात

आजारांची साथ, लहान मुलांना धोका

देशाच्या रूग्णसंख्येत लहान मुलांचे प्रमाण 13 टक्के

मुलांमध्ये कोरोना आणि पोटाच्या आजाराचा वेगानं प्रसार

लहान मुलांना विषाणूजन्य संसर्गाचा धोका जास्त

OPD विभागात पोटाच्या विकारांनी ग्रस्त मुलांचे प्रमाण सर्वाधिक

Corona news
Akola Clash : दलित वस्तीच्या मुद्द्यावरून मोठा राडा; भाजप आणि ठाकरेंचे आमदार भिडले, एकमेकांना शिवीगाळ

मुलांमध्ये डायरिया, अति सुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक

देशात कोरोना रूग्णांची संख्या पाच हजाराच्यावर गेली आहे.दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलयं.

दरम्यान पालकांनी आणि शाळा प्रशासनं मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते पाहूया

Corona news
Shrikant Shinde News : आफ्रिकन देशांच्या दौऱ्यातून काय साधलं? खासदार श्रीकांत शिंदेंनी सांगितली A टू Z माहिती, VIDEO

काय खबरदारी घ्यावी?

मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे

मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात

मुलांनी पाण्याची बाटली आणि जेवणाचा डबा इतरांना देणे टाळावे

शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी

Corona news
200 year Old Condom : मेंढ्याच्या आतड्याने बनलेला अन् २०० वर्षे जुना 'लक्झरी कंडोम' अचानक चर्चेत; काय आहे खासियत?

दरम्यान कोरोनाच नाही तर पावसाळ्यात इतर साथीच्या आजारांचा संसर्गही मोठ्या प्रमाणावर होत असतो.त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारची लक्षण आढळल्यास तिकडे दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करणं कधीही योग्य.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com