Akola Clash : दलित वस्तीच्या मुद्द्यावरून मोठा राडा; भाजप आणि ठाकरेंचे आमदार भिडले, एकमेकांना शिवीगाळ

Akola political Clash :अकोल्यात मोठा राडा झाल आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि भाजपच्या आमदार भिडले. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांचे कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
akola News
akola Saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत प्रचंड राडा झाला आहे. भाजप आमदार रणधीर भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांवर धावून गेले. दोघांनी एकमेकांना प्रचंड अश्लील शिवीगाळ केली. दलित वस्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही आमदारांमध्ये भांडण झाल्याची माहिती मिळत आहे. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु होती. भर बैठकीत दोन्ही आमदाराची एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली. या बैठकीदरम्यान कार्यालयाबाहेर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही राडा झाल्याचे दिसून आले.

अकोल्यातील जिल्हा नियोजन बैठकीत दोन आमदार भिडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. दोन्ही आमदारांचे समर्थक जिल्हाधिकारी कार्यलयाच्या नियोजन भवनासोबत पोहोचले. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुखासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोहोचले. दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी परिसरता तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर पोलीसही मोठ्या संख्येने दाखल झाले.

akola News
Pune News : गाडी बाजूला थांबवली, त्यानंतर घाणेरड्या नजरेने बघू लागला अन्...; पुण्यातील महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव

नेमकं काय घडलं?

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात राडा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी दाखल झाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात जोरदार राडा झाला होता. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. दोघांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली होती.

akola News
Shrikant Shinde News : आफ्रिकन देशांच्या दौऱ्यातून काय साधलं? खासदार श्रीकांत शिंदेंनी सांगितली A टू Z माहिती, VIDEO

दोघांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमा झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढलं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी घेतली होती. जिल्हा नियोजन समिती अजूनही सुरु आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक ही पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.

akola News
Shocking : महाराष्ट्र हादरला! नराधमाने 'खाकी'ची लाज घालवली; पोलीस बापाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार

दरम्यान, दोन्ही आमदारांमध्ये राडा झाल्यानंतर अद्याप पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती हाती आलेली नाही. या राड्यानंतर अकोल्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com