Bakrid 2025 Holiday: बकरी ईदच्या दिवशी सरकारी सुट्टी असणार का? काय सुरु राहणार अन् काय बंद? वाचा सविस्तर माहिती

Eid Holiday Update: ईद अल-अधा किंवा बकरी ईद भारतात ७ जून २०२५ रोजी साजरी होण्याची शक्यता आहे. चंद्रदर्शनानुसार तारीख बदलू शकते; बँका, शाळा बंद, शेअर बाजार खुले असणार आहे.
Bakrid 2025 Holiday: बकरी ईदच्या दिवशी सरकारी सुट्टी असणार का? काय सुरु राहणार अन् काय बंद? वाचा सविस्तर माहिती
Published On

ईद अल-अधा, ज्याला ईद उल-जुहा किंवा बकरी ईद असेही म्हणतात. हा मुस्लिम धर्मातील दुसऱ्या क्रमांकाचा पवित्र सण मानला जातो. यंदा हा सण भारतात ७ जून २०२५ रोजी साजरा होण्याची शक्यता आहे. चंद्रदर्शनावर त्याची तारीख अवलंबून असते. या दिवशी देशभरातील बहुतांश शासकीय कार्यालये, शाळा आणि बँका बंद राहतील. मात्र, शेअर बाजार सुरू राहण्याची शक्यता आहे.

बँकांना सुट्टी असेल की नाही?

पैगंबर इब्राहिम यांनी पुत्र इस्माईल याचे बलिदान देण्याची तयारी दाखवली, त्याच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदनिमित्त, ६ जून २०२५ रोजी तिरुअनंतपुरम आणि कोची येथील बँका बंद राहतील. ७ जून २०२५ रोजी अहमदाबाद, गंगटोक, इटानगर, कोची आणि तिरुअनंतपुरम वगळता देशभरातील इतर सर्व बँका ईद अल-जुहा निमित्ताने बंद असतील, असे सूचित करण्यात आले आहे. ७ जून २०२५ हा पहिला शनिवार असल्यामुळे अहमदाबाद, गंगटोक, इटानगर, कोची आणि तिरुअनंतपुरम येथील बँका बकरी ईद असूनही नियमितप्रमाणे खुल्या राहणार आहेत.

शेअर बाजार खुले की बंद?

एनएसई आणि बीएसईने जाहीर केलेल्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, ६ आणि ७ जून २०२५ रोजी भारतीय शेअर बाजार सामान्यप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार नसून, गुंतवणूकदार नियमित व्यवहार करू शकतील.

सहकारी कार्यालयांवर काय परिणाम?

शनिवार, ७ जून २०२५ रोजी देशातील बहुतांश सरकारी कार्यालये बंद राहतील. मात्र, चंद्रदर्शनावर अवलंबून असलेल्या सणांमध्ये ईद-उल-फित्र, ईद-उल-जुहा, मोहरम आणि ईद-ए-मिलाद दिल्लीतील सुट्टीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. या संदर्भातील अंतिम घोषणा दिल्ली सरकारच्या पुष्टीनंतर केंद्र सरकारच्या मंत्रालयाद्वारे करण्यात येईल.

शाळा बंद राहणार का?

शनिवार, ७ जून २०२५ रोजी बकरी ईद साजरी होण्याची शक्यता असल्यामुळे देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, ही सुट्टी चंद्रकोर दिसण्यावर अवलंबून निश्चित केली जाईल, त्यामुळे अंतिम निर्णय त्या आधारे घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com