Shashikant Chavan : माझ्या कुटुंबाचं बरं वाईट घडल्यास...; हगवणे प्रकरणावर PI शशिकांत चव्हाणांचं स्पष्टीकरण, पत्रात काय म्हटलं?

Shashikant Chavan update : वैष्णवी हगवणे प्रकरणावर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पत्र लिहून त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
shashikant chavan News
shashikant chavan Saam tv
Published On

वैष्णवी हगवणे प्रकरणावर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि पोलीस निरीक्षक शंशिकांत चव्हाण यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणात सुपेकर यांचे मेहुणे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचंही नाव समोर आलं आहे. आरोपांच्या फैरी झडल्यानंतर पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

जालिंदर सुपेकर यांचे नातेवाईक असलेल्या शशिकांत चव्हाणांनी आरोपानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. 'माझ्या घरात एखादा वाईट प्रसंग घडल्यास अशा खोट्या बातम्या पसरवणारे जबाबदार राहतील, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे . हगवणे कुटुंबियांशी माझा कसलाही संबंध नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केलं. खेडमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा आणि सगळे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याची त्यांनी माहिती दिली. यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने पडताळणी करून काहीही तथ्य नसल्याचा अहवाल मंजूर केला असल्याची सुद्धा चव्हाण यांनी माहिती दिली.

शशिकांत चव्हाण यांच्या पत्रात काय लिहिले?

माझ्या संबंधी होत असलेल्या खोट्या आरोपांमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. सध्या सोशल मिडीयावर आणि प्रसार माध्यमांद्वारे माहिती आणि बातम्या प्रसारित होणारे हगवणे कुटुंबियांशी माझा कसलाही संबंध नाही. दिवंगत वैष्णवी हगवणे हिच्यासोबत घडलेले अमानवीय कृत्य हे कोणाचेही मुलीसोबत होवू नये.

त्यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी न्यायदेवतेकडे प्रार्थना आहे. मात्र, हगवणे कुटूंबियाशी संबंध जोडून वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. जालिंदर सुपेकर व त्याचा आधार घेवून आता माझ्यावर जे आरोप केले जात आहेत, ते अत्यंत चुकीचे व अर्धवट माहितीच्या आधारे केले जात आहेत.

shashikant chavan News
Ladki bahin yojana :...तरच 'लाडकी'चा हप्ता बँक खात्यात जमा होणार; महत्वाची माहिती आली समोर, पाहा व्हिडिओ

प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत असलेला माझ्यावर दाखल झालेला गुन्हा रजिस्ट्रर नंबर ८१८/२०२० भा. द. वि. ३०७ प्रमाणे हा मी दाखल केलेल्या गुन्हयातील आरोप असलेले राजेंद्र घनवट याचे वडील माननिय पोपट घनवट यांनी दाखल केला होता. सदर प्रकाराबाबत दि. ७/७/२०२० रोजी पोपट घनवट यांच्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा रजि. नं.१५२१/२०२० दि.०८/०७/२०२० रोजी दाखल करणेत आला होता. त्यामध्ये मिरा गुलाब सोनवणे, गौतमी प्रविण रोकडे यांनी त्याला हाताने मारहाण करुन शिविगाळ केली असे नमूद केले होते.

सदर घटनेत पोपट घनवट यांना कोणतीही जखम नसताना पुन्हा त्याच घटनेबाबत दि. १४/७/२०२० रोजी गुन्हा रजिस्ट्रर नंबर ८१८/२०२० भा. द. वि. ३०७ प्रमाणे जीवे मारण्याचा प्रयत्न केला यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये मिरा गुलाब सोनवणे, गौतमी रोकडे, राजू रकम सोनवणे, राहुल सोनवणे, मिलिंद सोनवणे, बबन काशिनाथ सोनवणे व इतर ०२ अनोळखी इसमांविरुध्द तक्रार केली व त्यांना मी फूस लावली आहे.

पोपट घनवट याने स्वतःच उच्चार करुन माझे नाव सदर गुन्ह्यात टाकायला लावले आहे. आरोपीपैकी कोणीही माझ्या नावाचा उल्लेख केलेला नाही. सदर प्रकार हा पाईट खेड येथे झाला होता. व मी त्यावेळी कोविड काळात सातारा येथे होतो. त्यामुळे सदर गुन्ह्याशी माझा कसलाही संबंध नाही. तसे मी तपासी अधिकारी व कोर्ट यांना माझे म्हणणे सादर केले आहे. सदर बाब न्यायप्रविष्ठ आहे.

फिर्यादी असलेल्या गुन्ह्यामध्ये मृत व्यक्तीच्या नावावर माननिय राज घनवट याने त्याचा अंगठा उमटवला आहे, असा सीआयडीने अहवाल दिला आहे. सदर गुन्यात फिर्यादी म्हणून माझ्यावर दबाव आणण्यासाठी माननिय राज घनवट, माननिय पोपट घनवट यांनी वेळोवेळी आरोप केले आहेत.

तब्बल १० गुन्हे केल्याचे निदर्शनाला आल्याने ज्यांच्याविरुध्द विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत असे माननिय पोपट घनवट याचे तक्रारीवरुन माझे, माझी पत्नी, वडील यांच्या बिल्डींग व्यवसाय व उत्पन्नाची उघड चौकशीही झाली आहे. माझ्या कुटुंबाच्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत हे पडताळून पाहिल्यावर माझ्याकडे अथवा माझे कुटुंबाकडे अपसंपदा मिळून आली नाही. तसेच यापूर्वी माझ्यावर दाखल झालेल्या गुन्यामध्ये कोर्टाने स्वतः पडताळणी करून काहीही तथ्य नसल्याचा अहवाल मंजूर केला आहे.

shashikant chavan News
Bakra Eid 2025 : बकरी ईदच्या दिवशी पशूहत्यावर बंदी; दिल्ली सरकारने तातडीने घेतला मोठा निर्णय

प्रसार माध्यमातून सातत्याने माझ्यावर होणा-या बातम्यांसह आरोपांमुळे माझे संपूर्ण कुटुंबीय नैराश्यात गेले आहे. त्यामुळे माझ्या घरात एखादा वाईट प्रसंग घडल्यास अशा खोट्या बातम्या पसरवणारे माननिय व त्यांना साथ देणारे जवाबदार राहतील.

पोलिसांना तुमच्या मदतीची गरज आहे. पोलीसांचे मनोधैर्य खच्ची झाल्यास त्याचे सामाजिक आरोग्यावर दुरगामी परिणाम नक्कीच होणार. आपण सुज्ञ आहात, सत्यमेव जयते, जयहिंद, जय महाराष्ट्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com