BJP : निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका; बड्या नेत्याने सोडली साथ

manish kashyap resign : बिहारच्या निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. बिहारमधील मनिष कश्यप यांनी भाजपच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला आहे.
manish kashyap News
manish kashyap resignSaam tv
Published On

बिहार निवडणुकीआधी भाजपला मोठा झटका बसला आहे. प्रसिद्ध युट्युबर आणि भाजप नेते मनीष कश्यप यांनी पक्षाची साथ सोडली आहे. मनीष कश्यप यांनी फेसबुक लाईव्ह करत राजीनाम्याची घोषणा केली आहे. कश्यप यांनी २५ एप्रिल २०२४ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 'मी गावातील लोकांशी चर्चा करून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं मनीष कश्यप यांनी पक्ष सोडताना म्हटलं आहे.

manish kashyap News
Bakra Eid 2025 : बकरी ईदच्या दिवशी पशूहत्यावर बंदी; दिल्ली सरकारने तातडीने घेतला मोठा निर्णय

मनीष कश्यप यांनी पुढे म्हटलं की, 'मी पक्षात राहून लोकांचा आवाज उचलू शकत नाही. त्यानंतर मी निर्णय घेतला आहे. मला हा निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे. काही नेत्यांनी माझ्यावर महत्वकांक्षी होण्याचा आरोप केला आहे'.

'मला प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे. आता लोकांनी सांगावं की, आता मी स्वत:चा पक्ष स्थापन करावा का? परंतु मी त्या स्थितीत नाही. मी काय करावं? कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली पाहिजे? एकट्याने की स्वतंत्र्य लढलं पाहिजे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

manish kashyap News
Prakash Ambedkar : भारत-पाक युद्धात विजयाची संधी का गमावली? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

यूट्यूबर मनीष यांनी नाव घेता भाजप नेत्यांवरही निशाणा साधला. कश्यप यांनी म्हटलं की, 'तुम्ही भ्रष्टाचार पाहूनही डोळे बंद करून बसला आहात. बिहारच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी उभा आहे. माझा लढा आरोग्य व्यवस्था सुधरवण्यासाठी आहे. काही दिवसांपूर्वी मनीष यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती.

manish kashyap News
Shashikant Chavan : माझ्या कुटुंबाचं बरं वाईट घडल्यास...; हगवणे प्रकरणावर PI शशिकांत चव्हाणांचं स्पष्टीकरण, पत्रात काय म्हटलं?

मनीष यांना झालेल्या मारहाणीची दखल भाजप नेत्यांकडून घेण्यात आली नव्हती. यावरून नाराज होऊन मनीष यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मनीष कश्यप यांनी २८ मार्च लाईव्ह यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. मनीष यांनी गुरुवारी रात्री म्हटलं की, पोलिसांनी युट्युब चॅनलच्या विरोधात एफआयआर नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com