
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला. घरामध्ये चोरीच्या उद्देशाने घुतलेल्या चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला. सैफ अली खानने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोराने त्याच्यावर धारधार शस्त्राने आणि चाकून हल्ला केला. चोराने त्याच्यावर पाच ते सहा वेळा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. याप्रकरणाता तपास पोलिसांकडून सुरू आहेत. एका हल्लेखोराची ओळख पटली असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या वांद्रे येथील घरात घुसले होते. एका आरोपीची ओळख पटली आहे. आता पोलिस इतर आरोपींची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. एक आरोपी फरार असून, त्याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.
डीसीपी दीक्षित यांनी पुढे सांगितले की, त्यांना गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास सैफवर चाकूने हल्ला झाल्याची बातमी मिळाली. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास हल्लेखोर सैफच्या घरात घुसला आणि मोलकरणीसोबत त्याचा वाद झाला. तेव्हा सैफ तिथे आला आणि त्याने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मोलकरणीचा आवाज ऐकून तैमूर आणि जेह उठला आणि त्यांनी सैफला बोलावले. सैफ तिथे आला तेव्हा त्याने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोराने सैफवर चाकून सहा वेळा वार केले. सैफच्या हातावर, मानेवर, आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत.
डीसीपी दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर फायर एस्केपमधून घरात घुसला होता आणि भांडणाच्या वेळी सैफवर चाकूने हल्ला केला. आरोपींनी पायऱ्यांवरून घरात प्रवेश केला आणि तिथून पळ काढला. एकच आरोपी आहे ज्याच्या हालचाली घटनेच्या वेळी अपार्टमेंटमध्ये दिसत होत्या. चोरीच्या उद्देशाने आरोपी घरात घुसले होते.
सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत. सर्वात खोल जखम त्याला मान आणि मणक्याला झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी सैफच्या पाठीच्या कण्यातील २.५ इंचाचा तुकडा काढला. सैफला शुक्रवारी १७ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.