Hingoli Police : 'आधी चोरटे पकडू द्या नंतर तक्रार दाखल करू', पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदारासोबत काय झालं?

Hingoli News : चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला सीसीटीव्ही आणा असे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज देऊन सुद्धा तक्रार दाखल न केल्याने तक्रारदार त्रस्त झाले आहेत.
Hingoli police news.
Hingoli police news.Saam Tv
Published On

संदीप नागरे साम प्रतिनिधी

Hingoli Police News : हिंगोलीत पोलीस ठाण्यात एका तक्रारदारासोबत विचित्र प्रकार घडला आहे. कारची चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी तक्रारदार पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तेव्हा तेथील पोलिसांनी अनेक कारणं देत तक्रार दाखल करण्यास विलंब केला. तक्रारदाराने सीसीटीव्ही फुटेज, कागदपत्रे आणूनही पोलिसांनी त्यांना ताटकळत ठेवले.

शुक्रवारी (१० जानेवारी) हिंगोली शहरातील बियानी नगर परिसरात एकाच वेळी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची चोरी झाली. लॉक उघडत नसल्याने काचा फोडून गाडी घेऊन चोर पसार झाले होते. या चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी गाडीचे मालक भूषण जैस्वाल पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली आणि जैस्वाल यांना 'तुमच्याकडे सीसीटीव्ही आहेत का' असा सवाल केला. पोलिसांच्या प्रश्नावर जैस्वाल यांनी होकारार्थी उत्तर दिले.

त्यावर पोलिसांनी 'तुमच्या गाडीची चोरी झाली आहे. तुम्हीच सीसीटीव्ही आणून द्या' असे जैस्वाल यांना सांगितले. पोलिसांच्या विचित्र मागणी जैस्वाल गोंधळात पडले. पण तरीही त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले. सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेल्यानंतरही पोलिसांनी चोरीची तक्रार दाखल केली नाही. उलट जैस्वाल यांना गाडीची कागदपत्रे आणा, असे हिंगोली पोलिसांनी सांगितले.

Hingoli police news.
Kolhapur News : वधू- वर नोंदणी संकेतस्थळावरून केली ओळख; लग्नाच्या आमिषने महिलेची फसवणूक; पुण्यातील एकाला घेतले ताब्यात

सलग तिसऱ्या दिवशी गाडीची कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज घेऊन भूषण जैस्वाल पोलीस ठाण्यात पोहोचले. पण त्यांना पोलिसांनी दोन तास ताटळकत ठेवले. शिफ्ट संपली आहे, आता उद्या या; सीसीटीव्ही आणा, कागदपत्रे आणा अशी कारणे देत तक्रार दाखल न करणाऱ्या पोलिसांमुळे जैस्वाल त्रस्त झाले आहेत. चोरटे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत पण पोलीस तक्रार दाखल करत नसल्याने चोरांना अटक कोण करणार, त्यांना कोण पकडणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

Hingoli police news.
Protest in Parli : वाल्मिक कराडला मकोका, कोठडी; आईला आली चक्कर, परळी बंद, सकाळपासून काय काय घडलं?

चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असतानाही पाच दिवसांपासून हिंगोली पोलिसांनी तक्रारदाराला ताटकळत ठेवले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या सूचनांना केराची टोपली दाखवली आहे असे लोक म्हणत आहेत.

Hingoli police news.
Nylon Manja Death: नायलॉन मांजानं कुणाचा बळी, तर कुणाचा चिरळा गळा, कुणाला ४५ टाके; संक्रांतीच्या दिवशीच राज्यात दुर्दैवी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com