Kolhapur News
Kolhapur NewsSaam tv

Kolhapur News : वधू- वर नोंदणी संकेतस्थळावरून केली ओळख; लग्नाच्या आमिषने महिलेची फसवणूक; पुण्यातील एकाला घेतले ताब्यात

Kolhapur Crime : संकेतस्थळावर मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधत तो कोल्हापुरात येऊन महिलेस आणि तिच्या नातेवाईकांना भेटला त्याने आपण उच्चशिक्षित असून इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितलं
Published on

रणजित माजगाववर 

कोल्हापूर : आजकाल विवाहासाठी नोंदणी करण्यासाठी काही ऑनलाईन वेबसाईड आहेत. या वेबसाइडवर नोंदणी करत मुलामुलींचा शोध घेतला जात असतो. मात्र वधू- वर नोंदणी संकेतस्थळावर बायोडाटा अपलोड करून त्याचा गैरवापर करत महिलांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या पुण्यातील एकाला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पुण्यातील फिरोज निजाम शेख असे कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. फिरोज शेख या तरुणाने एका वधू- वर नोंदणी संकेतस्थळावर स्वतःचा बायोडेटा अपलोड करत लग्नासाठी मुलींचा शोध घेत असल्याचं भासवत होता. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील एका घटस्फोटीत महिलेला दुसरं लग्न करायचे असल्याने तिने आपला बायोडेटा संबंधित नोंदणी संकेतस्थळावर अपलोड केला होता. 

Kolhapur News
Dahanu Mahalakshmi Fort : उपाशीपोटी गड चढला, दर्शन घेऊन उतरताना उलटी झाली अन् क्षणात जीव गेला

महिलेच्या कुटुंबीयांची देखील घेतली भेट 

संकेतस्थळावर मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून फिरोज शेख याने महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर तो कोल्हापुरात येऊन या महिलेस आणि तिच्या नातेवाईकांना देखील भेटला. त्याने आपण उच्चशिक्षित असून इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितलं. या महिलेच्या कुटुंबाला खोटी माहिती सांगून त्याने या सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने सतत महिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. तर वरचेवर कोल्हापुरात येऊन तिची भेट घेऊ लागला. भेटीगाठी होऊ लागल्याने महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला मोठी रक्कम दिली. 

Kolhapur News
Jalgaon News : संक्रांतीच्या आदल्या दिवशीच शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; कर्जबाजारीपणातून संपविले जीवन

मुंबईतील महिलेचीही फसवणूक 

मात्र फिरोज शेख याने या महिलेचे फोन घेण्यास टाळाटाळ करू लागला. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिरोज शेख विरुद्ध तक्रार नोंदवली. कोल्हापूर पोलिसांनी पुण्यात जाऊन फिरोज शेख याला ताब्यात घेऊन अटक केली. तर फिरोज शेखने मुंबईतील एका महिलेची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचा समोर आले आहे. फिरोजने याच पद्धतीने इतर जिल्ह्यातील महिला आणि मुलींची फसवणूक केलेली आहे का? याचा तपास सध्या कोल्हापूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com