पालघर : संपूर्ण कुटुंब देवीच्या दर्शनासाठी गेले असताना डहाणू येथील महालक्ष्मी गडावर उत्साहात धावतच चढले. महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन सर्वजण खाली उतरण्यासाठी निघाले. गडाच्या काही पायऱ्या उतरल्यानंतर कुटुंबातील एका तरुणाला उलटी झाली. यानंतर कुटुंबीयांनी त्याला सावरले. मात्र काही क्षणातच त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
ट्रेकिंगचे आवड असेल, मात्र सवय नसेल तर ते जीवावर बेतू शकते. असाच प्रकार पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडला आहे. डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा दर्शन घेऊन उतरताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिलन डोंबरे (वय ३५) असं मृत झालेल्या तरुणाचं नाव असून मिलन आपल्या पत्नी भाऊ आणि इतर कुटुंबीयांसह महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेला होता.
पायऱ्या उतरताना ओढवला मृत्यू
डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी उंच असलेल्या गडावर जाताना मिलन हा गडावर हजार पायऱ्या सहजच चढला. मात्र उतरताना त्याला अचानक उलटी झाली आणि काही क्षणातच त्याचा तिथेच मृत्यू झाला. मिलनच्या कुटुंबीयांनी मिलनला खांद्यावर घेऊन कासा उपजिल्हा रुग्णालय गाठलं. मात्र तोपर्यंत मिलनचा मृत्यू झाला होता. देवीच्या दर्शनाला आनंदात गेलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोटात काही नसताना उंचावर चढल्याने घात
पोटात अन्न नसताना अती उंचावर चालल्याने मिलनचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. दरम्यान सवय नसेल, तर अचानक ट्रेकिंगसाठी ट्रेकर्सने जाऊ नये असा आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. अशाच ट्रेकिंगच्या आवडीतून मिलनला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे ट्रेकिंग करताना आधी शरीराची थोडीफार कसरत करून नंतरच ट्रेकिंग करा; असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.