चेतन व्यास
वर्धा : मालमत्ता कर थकबाकी असलेल्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यावर भर दिला जात आहे. वर्धा नगरपालिकेने देखील वसुली मोहीम तीव्र केली असून शहरात सुमारे साडेआठ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. हि वसूल करण्यासाठी शहरातील ५०० मालमत्ता कर थकबाकीदारांना रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील दोन- अडीच महिन्यात हि वसुली करण्यात येणार आहे.
मालमत्ता थकबाकी धारकांकडून नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी कर वसुली करण्यात येते. मात्र अनेकजण कर भरण्यास टाळटाळ करतात. त्यामुळे कराच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत जातो. यामुळे शहरातील विकास कामे करण्यात देखील अडचण येत असते. दरम्यान मार्च एंडिंग जवळ येत असल्याने थकीत रक्कम वसुली करण्यावर नगरपालिकांच्या भर आहे. त्यानुसार वर्धा नगरपालिकेने देखील वसुलीच्या अनुषंगाने पाऊल उचलले आहे.
पाचशे मालमत्ता धारकांना नोटीस
मागील काही वर्षात मालमत्ता धारकांकडून कर भरण्यात आला नसल्याने वर्धा नगरपालिकेची तब्बल साडेआठ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. मालमत्ता कर थकीत असल्यामुळे पालिकेच्या विकास कामांना देखील त्याचा फटका बसत आहे. मालमत्ता कर भरण्याच्या अनुषंगाने नगरपालिकेच्या वतीने तब्बल ५०० मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
वसुली केवळ ३० टक्के
वर्धा नगरपालिकेची एकूण मालमत्ता कराची मागणी १२ कोटी रुपये आहे. त्यातील केवळ तीन कोटी ५० लाख रुपये वसूल झाले असल्याची माहिती आहे. मालमत्ता कर वसुलीची टक्केवारी केवळ ३० टक्के आहे. सध्या साडेआठ कोटी रुपये मालमत्ता कर थकीत असल्याची माहिती आहे. येत्या अडीच महिन्यात हि वसुली वाढविण्यावर नगरपालिकेचा भर राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.