Saif Ali Khan attack: सैफवर घरातच चाकू हल्ला, करिना कपूर कुठे होती? 'गर्ल्स नाईट आऊट'ची पोस्ट व्हायरल

Bollywood Actor Saif Ali Khan: सध्या अभिनेत्री करिना कपूर खानची पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच सैफ अली खानवर हल्ला झाला, तेव्हा करिना कपूर खान कुठे होती? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
kareena kapoor post
kareena kapoor postSaam Tv News
Published On

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झालाय. सध्या सैफ अली खानवर मुंबईच्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या मान, पाठ आणि हातावर वार करण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर बॉलिवूड हादरलीय. नेत्यांनी देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केलाय. अशातच अभिनेत्री करिना कपूर खानची पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच सैफ अली खानवर हल्ला झाला, तेव्हा करिना कपूर खान कुठे होती? असा प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूड हादरली आहे. सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा पत्नी करिना कपूर घरी नव्हती. सोशल मीडियावर तिने केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एक घर आहे. तसेच टबेल आहे, टेबलावर काही खाद्यपदार्थ देखील आहेत. 'गर्ल्स नाईट आऊट' असे कॅप्शन फोटोला दिले आहे. करिश्मा कपूरने आधी स्टोरी ठेवली होती, तीच स्टोरी करिनाने रिशेअर केलीय.

kareena kapoor post
Baldness Virus: टक्कल व्हायरसमुळे मुलांचे लग्न जुळेना! बुलढाण्यातील गावकरांच्या अडचणीत वाढ

ज्यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, ज्यावेळी सैफ अली खानवर हल्ला झाला, तेव्हा करिना कपूर, बहीण करिश्मा कपूर, सोनम कपूर आणि काही मैत्रीणींसोबत नाईट आऊट पार्टी करीत होती. सैफ अली खानवर गुरूवारी २.३०च्या सुमारास हल्ला झाला. करिना कपूरने ७ तासांपूर्वी ही पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

kareena kapoor post
Chhadi Baniyan Gang: शिरपुरात पुन्हा एकदा 'चड्डी बनियन गँगची दहशत', दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

सैफ अली खानवर उपचार सुरू

सैफ अली खानवर मुंबईतील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानला साडे तीन वाजता रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीरावर एकूण ६ जखमा असल्याची माहिती आहे. त्यापैकी २ खोल जखमा आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांची १५ पथकं करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com