Chhadi Baniyan Gang: शिरपुरात पुन्हा एकदा 'चड्डी बनियन गँगची दहशत', दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

Chaddi Baniyan Gang: चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांची दहशत कमी होत असताना, शिरपूर शहरात पुन्हा एकदा चड्डी बनियन गँगची दहशत पाहायाला मिळाली आहे. चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांनी घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न केलाय.
chhadi baniyan gang
chhadi baniyan gangSaam tv
Published On

काही महिन्यांपूर्वी विविध भागांमध्ये चड्डी बनियन गँगने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. चड्डी बनियन गँगची प्रचंड दहशत वाढली होती. चोरटे चड्डी बनियनमध्ये येऊन चोरी करून पसार व्हायचे. चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांची दहशत कमी होत असताना, शिरपूर शहरामध्ये पुन्हा एकदा चड्डी बनियन गँगची दहशत पाहायाला मिळाली आहे. चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांनी घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न केला असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माणा झाले आहे.

शिरपूर शहरामध्ये पुन्हा एकदा चड्डी बनियन गँगची दहशत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. शिरपूर शहरातील एका गावातील घरात चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला तर खरा, पण चोरट्यांवर सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद चोरट्यांचा चोरीचा थरार कैद झाला असून, याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेच चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

chhadi baniyan gang
Baldness Virus: टक्कल व्हायरसमुळे मुलांचे लग्न जुळेना! बुलढाण्यातील गावकरांच्या अडचणीत वाढ

शिरपूर शहरातील तपनभाई मार्गवरील श्रीसाई समर्थ नगरमध्ये घरफोडी करून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. दरम्यान, घरफोडीत किती किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला, याबाबत शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

chhadi baniyan gang
Nylon Manja: राज्यात नायलॉन मांजाची दहशत; जीवघेण्या मांजाने महिला पोलीस कॉन्स्टेबलचं नाक कापलं

चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांनी नेमकं किती किमतीचा मुद्देमाल लंपास केला याचा शोध पोलीस करीत आहेत. या चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कशापद्धतीने घरफोडून चोरी करीत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत असून, चड्डी बनियन गँगमुळे पुन्हा एकदा गावाकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com