
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावातील नागरीक केस गळतीमुळे हैराण आहेत. केस इतक्या प्रमाणात गळत आहेत, की काही जणांचे टक्कल पडले आहेत. एकीकडे टक्कल व्हायरसमुळे हैराण झालेले लोक आणखीन एका समस्येने त्रस्त आहेत. ती समस्या म्हणजे मुलांचे लग्न जुळेना. एकूण आश्चर्य वाटलं ना? पण हो, बोंडगावासह इतर गावातील मुलांना लग्नासाठी कुणीही मुली द्यायला तयार नाहीत. तसेच मुलींना देखील कुणीही लग्नासाठी मागणी घालत नाहीये. या समस्येमुळे अनेक मुले नाराज असल्याची माहिती आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ, या गावांमध्ये टक्कल व्हायरसने हाहाकार माजवला आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत शेगाव तालुक्यात आरोग्या विभागाकडून घरोघरी संरक्षण सुरू आहे. मात्र तरीही, केस गळतीच्या आजाराचे निदान करण्यात आरोग्य यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही.
आयसीएमआरची टीम जिल्ह्यात तळ ठोकून आहे. सर्व प्रकारचे नमुने घेतल्या जात आहेत. नागरीकांचे केस नेमकं कशामुळे गळत आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशातच आणखीन एका काराणामुळे तेथील नागरीक त्रस्त आहेत. मुलांचे लग्न जुळत नसून, टक्कल व्हायरसचं थैमान वाढल्यानं कुणीही गावातील मुलांना लग्नासाठी मुलगी तयार नाहीत. तसेच मुलींना देखील कुणीही लग्नासाठी मागणी घालत नाहीये.
टक्कल व्हायरसच्या भीतीने सोयरीक जुळत नसल्याने ऐन लग्नसराईच्या मौसमात लग्नाला आलेल्या मुलांना कुणीही लग्नासाठी मुली तयार नाहीत. तर मुलींना देखील लग्नासाठी कुणीही मागणी घालत नाहीये. केस गळतीच्या आजाराचे निदान करण्यात आरोग्य यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरींकाचे केस नेमके कशामुळे गळत आहेत? याचा शोध घेऊन लवकरात लवकर संकटातून मुक्त करावं अशी मागणी गावकरी करू लागले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.