Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray Mira Bhayandar : मीरा-भाईंदर येथे झालेल्या सभेमध्ये हिंदी सक्तीच्या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकार त्यातही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
raj thackeray devendra fadnavis
raj thackeray devendra fadnavisSaam Tv
Published On

Raj Thackeray At Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषिकांच्या विरोधात मोर्चा निघाला होता. त्यानंतर मनसेकडूनही मोर्च्याला प्रत्युत्तर देण्यात आले. या मोर्च्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे मीरा भाईंदरमध्ये आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडून होणाऱ्या हिंदी सक्तीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले.

'राज्य सरकारने हिंदी सक्तीची केली, त्यावरून हे सर्व सुरू झाले. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार असे सांगितले. त्यांना आत्महत्या करायचं तर करावी. त्या दिवशीच्या मोर्चाने धसका बसला. तिसरी भाषा सक्तीची आणणार म्हणजे आणणार तुम्ही सांगताय, पण तुम्ही पहिलीपासून हिंदी आणायाचा प्रयत्न करा.. दुकाने काय शाळाच बंद करू', असे राज ठाकरे म्हणाले.

raj thackeray devendra fadnavis
Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत युती कधी करणार? उद्धव ठाकरेंनी नेमकी रणनीती सांगितली

'त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारच राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी ती बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्च्याच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला होता. फडणवीस जी तुम्ही सांगताय ना महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न करुन बघा, दुकान नाही तर शाळाही बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. इतर ज्या शाळा आहेत, त्यात तुम्ही मराठी सक्ती करायला पाहिजे ते सोडून तुम्ही हिंदीची सक्ती करत आहात. कोण दबाव टाकतंय तुमच्यावर हे केंद्राचं पूर्वीचं आहे काँग्रेसपासून ते सुरुय', असे म्हणत राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

raj thackeray devendra fadnavis
Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो झाला, त्याचा इतका प्रचंड लढा झाला. मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता. काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता, गुजराती नेत्यांचा होता. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी जे पहिलं बोललं गेलं ते पहिलं वल्लभभाई पटेलांनी बोललं गेलं, ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणत होतो. ज्या-ज्या वेळेस महाराष्ट्रात आंदोलन झालंय त्या-त्या वेळेला मोरारजी देसाईंनी गोळीबार करुन मराठी माणसाला ठार मारलं होतं. गेल्या अनेक वर्षांचा यांचा मुंबईवरचा डोळा आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

raj thackeray devendra fadnavis
Raj Thackeray :...तर दुकानं नाही शाळाही बंद करून टाकेन; हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com