Raj thackeray News
Raj thackeray Saam tv

Raj Thackeray :...तर दुकानं नाही शाळाही बंद करून टाकेन; हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

Raj Thackeray Latest speech : राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे.
Published on

Raj Thackeay Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरारोड येथील जाहीर सभेत फडणवीस सरकारवर टीका केली. त्रिभाषा सूत्रांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.'महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्ती केल्यास दुकान नाही तर शाळाही बंद करून टाकेन, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शुक्रवारी मिरारोड येथे जाहीर सभा होत आहे. मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभेला महत्व प्राप्त झालं आहे. मराठी मोर्चानंतर राज ठाकरे यांची पहिल्यांदा मिरारोडमध्ये सभा होत आहे. मिरारोड येथील राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर महिलांची संख्या पाहायला मिळते आहे. राज ठाकरे यांनी मिरारोड येथील सभेत परप्रांतीयांच्या मोर्चावरही टीका केली.

Raj thackeray News
Devendra Fadnavis : विधीमंडळातून लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर...; देवेंद्र फडणवीसांकडून मोठी भीती व्यक्त

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

महाराष्ट्रात राहाताय, शांतपणे राहा. मस्ती करणार असाल तर दणका बसणारच आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावे. आता दुकाने बंद केली, नंतर शाळाही बंद करेन. अनेक वर्षांपासून त्यांचा मुंबईवर डोळा आहे. ते तुम्हाला चाचपडून बघत आहेत. हिंदी भाषा सक्तीची करून मराठी माणूस पेटतोय का बघू.. मराठी माणूस शांत दिसला... तर हिंदी आणणे ही पहिली पायरी असेल. हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि ती गुजरातला न्यायची, हे त्यांचे स्वप्न आहे.

भाषेचा विषय येतो कुठे... तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की काही अर्थ नाही. भाषा टिकवणं, जमीन टिकवणं महत्त्वाचं आहे. मुंबईत काही गोष्ट झाली, की देशभर चालू ठेवतात. हिंदी चॅनेलवाले सत्ताधाऱ्यांच्या चपलाखालचे ढेकणं आहेत.

Raj thackeray News
Maharashtra Politics : आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना शिक्षा होणार! पण कधी? विधानसभा अध्यक्षांनी वेळच सांगितली

२८ सप्टेंबर २०१८ - बिहारी लोकांना गुजराती लोकांनी मारहाण केली. २० हजार जणांना हाकलून दिले. ही बातमी कुठेही दिसणार नाही. यांच्या राज्यात हे वाटेल ते करणार.. बाहेरच्या लोकांना गुजरातमध्ये मारणार, हाकलून देणार.. या बातम्या झाल्या का? इथं मिठाई वाल्याच्या कानाखाली मारलं तर देशाची बातमी बनते. हे काय प्रकारचे राजकारण सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com