Raj Thackeray: मोठं होऊन पत्रकार होणार का? राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'त्या' चिमुकल्या मुलींनी दिलं असं उत्तर; ऐकून मनसे अध्यक्षही चकीत

Raj Thackeray Praises Schoolgirls: कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या मुलींशी बराच वेळ गप्पा मारल्या.
Raj Thackeray: मोठं होऊन पत्रकार होणार का? राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'त्या' चिमुकल्या मुलींनी दिलं असं उत्तर; ऐकून मनसे अध्यक्षही चकीत
Raj Thackeray Praises Schoolgirls Saam Tv
Published On
  • राज ठाकरे यांनी कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींची घेतली भेट

  • राज ठाकरेंच्या प्रश्नावर शाळकरी मुलींनी दिले भन्नाट उत्तर

  • कोंदिवडे गावातील मुलींचा राज ठाकरेंसोबत संवाद

  • राज ठाकरे यांनी शाळकरी मुलींना अभ्यासाचा दिला सल्ला

  • महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर शाळकरी मुलींचा व्हिडीओ

राज्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास हा काही नवा नाही. या त्रासावर शाळकरी मुलींनी तयार केलेली एक रिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. रायगड जिल्ह्यातल्या कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींनी हातामध्ये छत्रीचा माईक म्हणून वापर करत रिपोर्टिंग केल्याच्या या व्हिडीओची राज्यभरात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर सोशल मीडियावर अशाच प्रकारचे शाळकरी मुलांनी अनेक व्हिडीओ तयार करून पोस्ट केले. पण कोंदिवडे गावातील विद्यार्थिनींमुळे राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेची ही मोहिम सुरू झाली. या शाळकरी मुलींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेत संवाद साधला.

कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींनी राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्यासोबत बराच वेळ गप्पा मारल्या. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारे त्यावर मुलींनी देखील जबरदस्त उत्तर दिली ते ऐकून राज ठाकरे थक्क झाले. यावेळी राज ठाकरे यांनी या मुलींना भेटवस्तू देत त्यांचा सन्मान केला. या मुली कोणत्या वर्गात शिकतात? आणि त्यांना मोठं होऊन काय बनायचं आहे ? असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी केले. चांगले शिक्षण घेऊन चांगला अभ्यास करण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी या मुलींना दिला.

Raj Thackeray: मोठं होऊन पत्रकार होणार का? राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'त्या' चिमुकल्या मुलींनी दिलं असं उत्तर; ऐकून मनसे अध्यक्षही चकीत
GEN -Z करणार 'नवनिर्माण', आता ठाकरेंची भिस्त GEN-Z वर?

तुम्ही मोठं होऊन कोण होणार, रिपोर्टर होणार आहात का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी या मुलींना केला. त्यावर यापैकी एका मुलीने मला स्टेनो व्हायचंय, दुसऱ्या मुलीने युट्यूबर व्हायचंय, तर तिसऱ्या मुलीने स्केच आर्टिस्ट व्हायचंय असं सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी या मुलींना तुम्ही अभ्यास करता का? असा देखील प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना या मुलींनी हो आम्ही अभ्यास करतो असे उत्तर दिले. या मुली म्हणाल्या, 'आमचे तीन ते चार तास वाया जातात. व्हिडिओ केल्यापासून आमचा अभ्यास होत नाही. अनेक लोकं आम्हाला भेटायला येतात. आमचे ३ ते ४ तास फक्त मुलाखत देण्यासाठीच जातात.'

Raj Thackeray: मोठं होऊन पत्रकार होणार का? राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'त्या' चिमुकल्या मुलींनी दिलं असं उत्तर; ऐकून मनसे अध्यक्षही चकीत
'Gen Z' कोणाला म्हणायचं? वयोगटानुसार जाणून घ्या सविस्तर

यावेळी राज ठाकरे यांनी या मुलींना मुलखती बंद करा. सध्या अभ्यास महत्वाचा आहे त्यामुळे अभ्यास करा असा सल्ला दिला. त्याचसोबत तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला कळवा मी तुमची मदत करेल असे देखील त्यांनी या मुलींना सांगितले. राज ठाकरे आणि या मुलींच्या भेटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलताना या मुलींनी आम्हाला राज ठाकरे यांना भेटून आनंद झाल्याचे सांगितले.

Raj Thackeray: मोठं होऊन पत्रकार होणार का? राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'त्या' चिमुकल्या मुलींनी दिलं असं उत्तर; ऐकून मनसे अध्यक्षही चकीत
Gen Alpha Club : रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता? भिवंडीच्या मुलींचा संतप्त सवाल; व्हिडिओ तुफान व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com