GEN -Z करणार 'नवनिर्माण', आता ठाकरेंची भिस्त GEN-Z वर?

Gen-Z Takes Centre Stage in Raj Thackeray: ज्या आंदोलनाची दखल देशानं घेतली त्या जेनझींची मदत आता राज ठाकरे घेणार असल्याचं दिसतंय. देशाच्या राजकारणात जेनझींच महत्व ओळखून राज ठाकरेंनी काय मोठा निर्णय घेतलाय पाहा,
Raj Thackeray Gen-Z strategy for MNS in Maharashtra politics
Raj Thackeray Gen-Z strategy for MNS in Maharashtra politicssaam tv
Published On

भारतातल्या Gen-Zने पेटवलेल्या अभूतपूर्व एल्गाराने केंद्रातलं सर्वात ताकदवान सरकार हादरल्याचं संपूर्ण जगाने पाहिलंय. त्यामुळेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपलं लक्ष जेन झींकडे वळलंय. पुण्यात पार पडलेल्या मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी Gen-Zला केंद्रस्थानी ठेवून मनसेची आगामी रणनिती आखलीय. दिल्लीत पेटलेलं पेपरफुटीविरोधातील आंदोलन मुंबईत झाल्यानंतर Gen-Zची वाढती क्रेझ आणि ताकद ओळखूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांसह या आंदोलनाला पाठींबा देत रस्त्यावर उतरुन समर्थन दिलं. त्यामुळे राज ठाकरेंनी जेन झींवर फोकस करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

GEN-Z वर फोकस करा'

भविष्यातील राजकारण पूर्णपणे 'Gen-Z'च्या वळणावर केंद्रित असणार

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन पिढीशी जास्तीत जास्त संपर्क वाढवण्यावर भर द्यावा

आजच्या तरुण पिढीमध्ये समाजात मोठे बदल घडवून आणण्याची अद्भुत आणि मोठी ताकद आहे

Gen-Zचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असल्यानं त्यांच्या विचारांशी जोडले पाहिजे

बदलत्या काळाची गरज ओळखून पक्षातही त्यानुसार आवश्यक बदल करण्यावर बैठकीत मंथन

केवळ मनसेच नव्ह तर काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जेनझींसाठी मैदानात उतरले. आणि हीच जेन झींची ताकद ओळखून भाजप विरोधात उतरलेल्या जेनझींचा रोष शांत करण्यासाठी खुद्द सरसंघचालक मोहन भागवतांनीही त्यांच्याही जाहिर व्यासपीठावर संवाद साधत त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं दिलखुलास उत्तर दिलं. तर मोदींनी देखिल जेनझींच्या आंदोलनात प्रभावी हत्यार ठरलेल्या इंस्टाग्रामची मदत घेत धडाधड सेल्फी व्हिडीओ बनवून आपल्या भावना पोहचवण्याचा प्रयत्न केला होताच.

थोडक्यात काय... तर आगामी काळातील सत्ताकारणाची सूत्रं Gen-Zच्या अवतीभोवती फिरणारेत. अभिजित दिपकेंच्या CJPने तुर्तास पक्ष स्थापन करणार नसल्याचं जाहीर केल्यावर सर्वच प्रस्थापित पक्षांनी या जनाधारावर डोळा ठेवलाय. आधी मराठीचा मुद्दा, नंतर हिंदुत्व आणि आता नवनिर्माणासाठी राज ठाकरेंनी Gen-Z ची साथ देत नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केलीये.Gen-Zच्या बळावर आता मनसेचे इंजिन सुसाट धावणार की ब्रेक लागणार? हे येणारा काळच ठरवेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com