Gen Alpha Club : रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता? भिवंडीच्या मुलींचा संतप्त सवाल; व्हिडिओ तुफान व्हायरल

Bhiwandi pothole roads : भिवंडीतील नांदकर-बाबदेव रस्त्यावरील खड्ड्यांची दुरवस्था शाळकरी मुलींनी अनोख्या पद्धतीने मांडली. प्लास्टिकच्या बाटलीला माईक बनवून केलेले त्यांचे ग्राउंड रिपोर्टिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
Bhiwandi’s pothole
Bhiwandi’s potholeSaam TV
Published On

Schoolgirls highlight Bhiwandi’s pothole-ridden roads : भिवंडी शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमधून नागरिकांची सुटका होण्याचे नाव दिसत नाही. प्रशासनाच्या या अनास्थेविरोधात आणि खड्डेमय रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका शाळकरी विद्यार्थिनीने शोधलेली अनोखी वाट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. हातात रिपोर्टिंगचा खरा माईक नसल्याने या चिमुकलीने थेट प्लास्टिकच्या बाटलीचाच 'माईक' बनवून रस्त्यांवरील खड्ड्यांची पोलखोल केली आहे.

संबंधित विद्यार्थिनीने भिवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर उतरून अगदी एखाद्या पत्रकाराप्रमाणे थेट 'ग्राउंड रिपोर्टिंग' सुरू केले. "माईक नाही तर काय झाले, बाटलीचा माईक बनवून मी रस्त्याची परिस्थिती दाखवणार," असा बाणा दाखवत तिने खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यातून वाट काढणाऱ्या नागरिकांचे हाल कॅमेऱ्यासमोर मांडले.

Bhiwandi’s pothole
Pune Police : पुण्यात खाकीला डाग! पोलीस स्टेशनमध्येच महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे; हवालदाराचे तडकाफडकी निलंबित

तिचा हा 'नेक्स्ट जेन रिपोर्टर' अवतार आणि प्रशासनाविरोधात केलेला अनोखा निषेध सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चिमुकलीच्या थेट आणि रोकठोक रिपोर्टिंगमुळे भिवंडी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचे धिंडवडे निघाले असून, आता तरी डोळे झाकून बसलेले प्रशासन जागे होऊन रस्ते दुरुस्त करणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Bhiwandi’s pothole
BJP Reshuffle : अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक', एकाच वेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, पाहा यादी

व्हिडीओत नेमकं काय आहे?

"नमस्कार, मी दिया शिवाजी कोनकर, मी दिव्यांका मनोज जाधव आणि या आमच्या मैत्रिणी.

आम्ही भिवंडी तालुक्यातील नांदकर या गावात राहतो. हा नांदकर-बाबदेव रस्ता आहे, या रस्त्याची दुरावस्था बघा. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे, तेसुद्धा समजत नाहीये. आम्ही रोज या रस्त्यातून शाळेत २ किलोमीटर चालत जात असतो. या रस्त्यातून जाताना आमच्या अंगावर चिखल उडतो, ज्यामुळे माझे कपडे पण खराब होतात.

तसेच या रस्त्यावरून गरोदर महिला, वृद्ध लोक आणि सामान्य नागरिकसुद्धा नांदकरवरून कल्याणला जाण्यासाठी या रस्त्यावरूनच प्रवास करतात.गेली ३-४ वर्षे झाली हा रस्ता असाच आहे. कोणतेही प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देत नाहीये. आमची मुख्यमंत्री साहेबांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि आमचा हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा, जेणेकरून आम्ही शाळेत नीट जाऊ शकू. धन्यवाद!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com