Manasvi Choudhary
सध्या 'Gen Z' हा शब्द प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियापासून ते ऑफिसच्या गप्पामध्ये 'Gen Z' हा शब्द ऐकायला मिळतो.
यानुसार, अनेकजण स्वत:ला 'Gen Z' समजतात. पण 'Gen Z' म्हणजे नेमकी कोणती पिढी? त्यांचा वयोगट काय असतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
'Gen Z' म्हणजे जनरेशन झेड असा त्याचा अर्थ होतो. जी मिलिनियम्स नंतरची आणि 'Gen Alpha' च्या आधीची पिढी आहे.
'Gen Z' वयोगटातील व्यक्ती साधारणपणे १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेली व्यक्ती 'Gen Z' मानली जाते.
'Gen Z' ही पहिली पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल युगात जन्माला आली आणि वाढली. ही पिढी लहानपणापासून इंटरनेट, मोबाईल, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या जगात मोठी झाली आहे.
'Gen Z' ही पिढी खूप स्वतंत्र विचारांची, स्पष्टवक्ती आणि आत्मविश्वासू आहे. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्य फार वेगवेगळे असते.
पूर्वी लोक मानसिक ताणतणाव किंवा डिप्रेशन या विषयावर उघडपणे बोलत नसायचे. परंतु, 'Gen Z' या विषयाबाबत अत्यंत मोकळेपणाने, बिनधास्तपणे बोलतात. ते आपल्या भावना लपवत नाहीत, गरज पडल्यास थेरपी घेतात आणि मानसिक आरोग्याला जपतात.
पूर्वी एकाच नोकरीत वर्षानुवर्षे आयुष्य काढत असत. पण 'Gen Z' यांना असे आवडत नाही. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि स्वातंत्र्याला महत्त्व देतात.
जुन्या पिढीला प्रगतशील तंत्रज्ञान शिकून घ्यावे लागले, पण'Gen Z' साठी हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कसे वापरावे, नवीन गॅजेट्स कसे वापरायचे हे त्यांना अचूक माहिती असते.