Raj Thackeray: महाराष्ट्रात झालेला SIR रद्द करा, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात गर्जना

RAJ THACKERAY SLAMS ELECTION COMMISSION: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोग आणि भाजपवर सडकून टीका केली. मतचोरी केल्याचा आणि निवडणूक आयोगाला ताब्यात ठेवल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला.
Raj Thackeray: महाराष्ट्रात झालेला SIR रद्द करा, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात गर्जना
RAJ THACKERAY SLAMS ELECTION COMMISSIONsaam tv
Published On: 
  • गर्जना मोर्चात राज ठाकरेंचे SIR वर मोठे वक्तव्य

  • महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया रद्द करा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी मागणी

  • राज ठाकरेंनी ज्ञानेश कुमार यांच्यावरही टीका केली

ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गर्जना मोर्चा काढला. मेट्रो सिनेमा इथून निघेला मोर्चा मुंबई महानगर पालिकेजवळ जाऊन धडकला. याठिकाणी झालेल्या सांगता सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्ञानेश कुमारांविरोधात गर्जना केली. त्यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातला एसआयआर रद्द करा अशी मागणी केली.

राज ठाकरे यांनी मतचोरीचा मुद्दा उचलून धरत सांगितले की, 'इथे उन्हामुळे वातावरण तापले आहे आणि देशातील वातावरण वोट चोरीमुळे तापले आहे. २०१७- १८ पासून हा राज ठाकरे तुम्हाला सांगत आहे निवडणुकीवर बहिष्कार टाका. त्याशिवाय दूध का दूध पाणी का पाणी होणार नाही. २०१७-१८ पासून सांगत आहे यामध्ये घोळ आहे. अशाप्रकारे मत कमी होऊ शकत नाही आणि भाजपची मतं अशी वाढू शकत नाही. २०१७-१८ पासून मतचोरी सुरू आहे.'

Raj Thackeray: महाराष्ट्रात झालेला SIR रद्द करा, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात गर्जना
Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या वाढलेल्या मतांवर आक्षेप घेत राज ठाकरे म्हणाले, 'मी काय म्हणत होतो हे आता सर्वांना समजायला लागले आहे. अन्यथा असं होऊच शकत नाही. विधानसभेच्या २०२४ च्या निवणुकीत संपूर्ण बहुमत महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेंना मिळाले. असा कोणता विजय असतो. जिथे विजय मिळवल्यानंतर लोकांमध्ये उत्साह नाही आणि जल्लोष नाही. ४० ते ६० लाख मतदार अचानक कसे वाढू शकतात. लोकसभेला भाजपला २ कोटी २७ लाख मतं मिळाली होती. विधानसभेला ३ कोटी १६ लाख मतं मिळाली होती. अचानक १ कोटी मतं कशी वाढली. आता तर सर्व गोष्टी उघड झाल्या आहेत.'

Raj Thackeray: महाराष्ट्रात झालेला SIR रद्द करा, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात गर्जना
Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

निवडणूक आयोगावरून भाजपवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, 'सत्ताधारी पक्षाला एकच गोष्ट सांगायची आहे. आम्हाला कुठला राग नाही आहे जे तुम्ही सत्तेवर बसला आहात. तुम्ही कशी राबलताय त्याचा राग आहे. कुणाला सत्ते बसवावे आणि कुणाला विरोधी पक्षात बसलायचे हे लोकांनी ठरवावे. या देशातील जनतेने काहीही ओरडावं, कितीही आंदोलनं आणि मोर्चे काढावे निवडणूक आयोग आमच्यासोबत असेल तर आम्ही कसेही निवडून येऊ. एखादा राजकीय पक्ष जेव्हा सत्ते बसलेला असतो त्याला भीती असते की उद्या एखादे पाऊल उचलले तर आपली सत्ता जाईल. पण यांना कसलीच भीती नाही. कितीही आंदोलनं करा आयोग त्यांचाच आहे.'

Raj Thackeray: महाराष्ट्रात झालेला SIR रद्द करा, राज ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात गर्जना
Gyanesh Kumar: मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com