पालखी सोहळ्यामुळे पुण्यात मोठे ट्रॅफिक बदल; 10 ते 15 जुलैदरम्यान ‘या’ रस्त्यांवर पूर्ण बंद

Traffic Diversions Announced in Pune Rural for Sant Dnyaneshwar Palkhi 2026: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त 10 ते 15 जुलैदरम्यान पुणे ग्रामीणमध्ये वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जेजुरी, निरा, सासवड मार्गांवर पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन.
Devotees walk along the highway during the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession as traffic diversions are enforced in Pune rural.
Devotees walk along the highway during the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession as traffic diversions are enforced in Pune rural.saam tv
Published On

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त 10 ते 15 जुलै 2026 या कालावधीत पुणे ग्रामीण भागात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळा सुरळीत पार पाडवा आणि वाहतूक कोंडी टाळावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत अधिकारांचा वापर करून पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे. यंदा पालखी 13 जुलै रिजी जेजूरी, 14 जुलै रोजी वाल्हा आणि 15 जुलै रोजी निरा येथे मुक्काम करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे 7 ते 8 लाख भाविक पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सुमारे 7 ते 8 लाख भाविक पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरून पायी प्रवास करणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

Devotees walk along the highway during the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession as traffic diversions are enforced in Pune rural.
Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर

जेजुरी, मोरगाव, पारगाव, निरा, सुपा, सासवड आणि लोणंद या प्रमुख ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. बारामती, सातारा, फलटण, लोणंद आणि पुणे दरम्यानची वाहतूक विविध फाटे आणि ग्रामीण मार्गांवरून वळवण्यात येणार असून केवळ पालखी व संबंधित वाहने यांना मूळ मार्गावर परवानगी असेल.

Devotees walk along the highway during the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession as traffic diversions are enforced in Pune rural.
Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

बेलसर फाटा, मोरगाव चौक, पारगाव मेमाणे चौक, छत्रपती शिवाजी चौक (निरा), जेऊर फाटा बायपास आणि भोरवाडी फाटा या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच सासवड आणि सुपा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

Devotees walk along the highway during the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi procession as traffic diversions are enforced in Pune rural.
Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी मार्गाची माहिती घ्यावी आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. पालखी सोहळ्यादरम्यान अनावश्यक प्रवास टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com