Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर

Pune- Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. ३ वाहनं एकमेकांवर धडकली. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला.
Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर
Pune AccidentSaam Tv
Published On
  • पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली

  • पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला

  • नारायणगावजवळ आयटी इंजिनिअरचा अपघातात मृत्यू

  • मुसळधार पावसामुळे महामार्गावर विचित्र अपघात

रोहिदास गाडगे, पुणे

पुण्यामध्ये ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. पुणे -नाशिक महामार्गावर ही भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील ५ जण एकाच कुटुंबातील आहेत. पुणे -नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नारायणगावजवळ पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. तीन वाहनं एकमेकांवर जोरदार आदळली. ही धडक इतकी भीषण होती अपघातामध्ये तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर
Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू

अपघात इतका भीषण होता की, यामध्ये आयटी इंजिनिअर संजय खंडाळगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांच्या मदतीने जखमींना वाहनांतून बाहेर काढून रुग्णालयात रवाना करण्यात आले. या अपघातामुळे काही काळ पुणे–नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर
Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

अपघातामधील पाचही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी तिन्ही वाहनं महामार्गावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

Pune Accident: पुणे- नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, आयटी इंजिनिअरचा मृत्यू; ७ जण गंभीर
Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com