Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशमध्ये भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव ट्रॅक्टर रस्त्यावर उलटला. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४० जण जखमी झालेत.
Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू
Madhya Pradesh AccidentSaam Tv
Published On
  • मध्य प्रदेशमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीला भीषण अपघात

  • ट्रॅक्टर ट्रॉल उलटून ६ जणांचा मृत्यू

  • अनूपपूरमध्ये भाविकांवर काळाचा घाला

  • बिजौरा गावाजवळ ट्रॅक्टर उलटला

मध्य प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर ट्रॉली उलटून या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ५० जण प्रवास करत होते. हे सर्वजण पूजा करण्यासाठी एका गावामध्ये जात होते. यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉली उलटली.

पोलिसांनी सांगितले की, मध्यप्रदेशच्या अनूपपुर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४० जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री करणपथार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिजौरा गावाजवळ घडला. या अपघातानंतर एकच खळबळ उडाली. किंकाळ्या आणि रडण्याच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला.

Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू
Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, ट्रॅक्टर- ट्रॉलीमध्ये जवळपास ५० जण प्रवास करत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. हे सर्वजण भाविक पूजा करण्यासाठी पदमनिया वरून बिजौरा गावात जात होते. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जणांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. तर जखमी झालेल्यांना उपचारासाठी पाली सामुदायिक आरोग्य केंद्र आणि उमरिया जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू
Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, 'बिजाउरा गावात झालेल्या रस्ते अपघातात लोकांचा अकाली मृत्यू आणि जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मंदिरात भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्याने हा अपघात झाला. माझ्या संवेदना पीडित कुटुंबियांप्रति आहेत. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.'

Accident: भाविकांवर काळाचा घाला, महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; ६ जणांचा जागीच मृत्यू
Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com