Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Mumbai Goa Highway Bus Accident News : मुंबई-गोवा महामार्गावरील आकेरी येथे अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात. चालकासह एक प्रवासी किरकोळ जखमी असून २१ प्रवासी सुदैवाने बचावले.
AKKALKOT DEVOTEES ESCAPE MAJOR ACCIDENT AFTER HUGE TREE FALLS ON VEHICLE AT AKERI ON MUMBAI-GOA HIGHWAY
AKKALKOT DEVOTEES ESCAPE MAJOR ACCIDENT AFTER HUGE TREE FALLS ON VEHICLE AT AKERI ON MUMBAI-GOA HIGHWAYSaam tv
Published On
Summary
  • अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात

  • चालकासह एका प्रवाशाला किरकोळ दुखापत

  • २१ प्रवासी सुखरूप बचावले

  • स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य करून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

Mumbai Goa Highway Bus Accident News अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठा अपघात घडला. ही घटना मुंबई-गोवा महामार्गावरील आकेरी येथे घडली. या अपघातात चालकासह एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून गाडीतील २१ प्रवासी सुदैवाने बचावले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील (Kudal Taluka) पिंगुळी-गुढीपूर येथील रहिवासी राजेश सिंगनाथ (Rajesh Singhnath) आणि त्यांचे कुटुंबीय तसेच नातेवाईक अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या ( Akkalkot Swami Samarth Temple) दर्शनासाठी खासगी वाहनाने निघाले होते. प्रवास सुरू असतानाच आकेरी परिसरात रस्त्यालगत उभे असलेले एक मोठे झाड अचानक वाहनावर कोसळले. झाड पडताच वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

AKKALKOT DEVOTEES ESCAPE MAJOR ACCIDENT AFTER HUGE TREE FALLS ON VEHICLE AT AKERI ON MUMBAI-GOA HIGHWAY
Monsoon Rain Update : राज्यात किती टक्के पाऊस पडणार? IMD च्या अंदाजाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच रस्त्यावर आडवे पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले. त्यामुळे काही वेळ बंद झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेमागे रस्त्यालगतच्या झाडांची धोकादायक अवस्था कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे अनेक झाडे अर्धवट जळतात. अशा झाडांचा आतील भाग पोकळ होतो, मात्र बाहेरून ती हिरवीगार दिसत असल्याने त्यांचा धोका सहज लक्षात येत नाही. मे महिन्यातील वादळी वाऱ्यांमुळे ही झाडे अचानक कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.

AKKALKOT DEVOTEES ESCAPE MAJOR ACCIDENT AFTER HUGE TREE FALLS ON VEHICLE AT AKERI ON MUMBAI-GOA HIGHWAY
PSI Transfer : महाराष्ट्रात बदल्यांचा धडाका! ४३ PSI सह ३९९ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी यंत्रणांच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गालगतची जळालेली, कमकुवत आणि धोकादायक झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com