Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?

Harshvardhan Patil and Pradeep Garatkar: इंदापुरमधील राजकीय समिकरणं बदलत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रदीप गारटकर यांच्यात जवळीक वाढत चालली आहे.
Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?
Harshvardhan Patil and Pradeep Garatkar Saam Tv
Published On
  • इंदापूरच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण तयार होतंय

  • हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा

  • हर्षवर्धन पाटील प्रदीप गारटकर यांच्या भेटीगाठी सुरू

  • कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर यांच्या भेटीची चर्चा

  • इंदापूरच्या राजकारणात २०२९ साठी नवे समीकरण

सागर आव्हाड, पुणे

पुणे जिल्ह्यातल्या राजकारणाबाबच मोठी बातमी समोर आली आहे. इंदापुरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. याठिकाणी कट्टर विरोधक पुन्हा जवळ येण्याची चर्चा सुरू झाली आहे. इंदापूर तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक अनपेक्षित राजकीय समीकरणे पाहायला मिळाली आहेत. एकेकाळी कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रदीप गारटकर सध्या पुन्हा एकदा जवळ येताना दिसत असल्याने इंदापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात असलेले हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये असलेल्या प्रदीप गारटकरांना नुकताच पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे, तर गारटकरांच्या नव्या आलिशान गाडीची पूजा करून पाटील स्वतः त्या गाडीचे सारथी बनले आणि दोघांनी इंदापूर शहरातून एकत्र फेरफटका मारला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे या भेटीमागे केवळ कौटुंबिक अथवा व्यक्तिगत स्नेह आहे की भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

कधीकाळी कट्टर राजकीय विरोधक

हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर यांचे राजकीय संबंध इंदापूर तालुक्यात सर्वश्रुत आहेत. एकेकाळी गारटकर हे पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून मैदानात उतरले होते. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणुकीतही लढत दिली होती. त्या निवडणुकीत गारटकरांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवत पाटील यांना कडवी झुंज दिली होती. मात्र राजकारणात कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू नसतात, हे इंदापूरच्या राजकारणाने पुन्हा एकदा दाखवून दिले.

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?
Kalyan - Dombivli Politics : भाजप-शिंदेसेना महायुती तुटणार? मनसेवरून मिठाचा खडा; संघर्ष चिघळण्याची शक्यता

नगरपालिका निवडणुकीत पाटील-गारटकर एकत्र

मागील नगरपालिका निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी आपले जुने राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांनी आघाडी स्थापन करून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात पॅनल उभे केले होते. या निवडणुकीत पाटील-गारटकर आघाडीला यश मिळाले नाही. अवघ्या काही मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र या निवडणुकीमुळे इंदापूरच्या राजकारणात एक महत्त्वाचा संदेश गेला. एकेकाळचे कट्टर विरोधकही राजकीय गरजेनुसार एकत्र येऊ शकतात. निवडणुकीत पराभव झाला असला तरी प्रदीप गारटकर यांची इंदापूर शहरातील राजकीय ताकद आणि संघटनात्मक प्रभाव कायम असल्याचे चित्र पुढे आले.

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?
Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

गारटकर भाजपमध्ये; समीकरणे पुन्हा बदलली

नगरपालिका निवडणुकीनंतर प्रदीप गारटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाटील आणि गारटकर पुन्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांत गेले. त्याच काळात हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय जवळीक वाढताना दिसू लागली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणात पाटील आणि भरणे एकत्र आले. एकमेकांच्या निवासस्थानी भेटी, सभांमध्ये एकत्र उपस्थिती आणि एकत्र प्रवास करतानाची छायाचित्रे यामुळे इंदापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली.

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

कधीकाळचे भरणेंचे खंदे समर्थक आता विरोधात -

प्रदीप गारटकर यांचा राजकीय प्रवास पाहिला तर आणखी एक महत्त्वाची बाब समोर येते. एकेकाळी गारटकर हे दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक मानले जात होते. भरणे यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी गारटकरांची भूमिका महत्त्वाची असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र काळ बदलला आणि राजकीय समीकरणेही बदलली. आज गारटकर आणि भरणे हे एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून समोर आले आहेत.

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड! भुसावळच्या बड्या नेत्यासह अनेक तरुण-तरुणींचा शिवसेनेत प्रवेश

वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून गाडीच्या पूजेपर्यंत -

दरम्यान, गारटकरांच्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील जवळीक पुन्हा चर्चेत आली. आता गारटकरांनी नवीन आलिशान वाहन घेतल्यानंतर ते वाहनपूजेसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पाटील यांनी गारटकरांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर वाहनाची पूजा करण्यात आली. याहीपेक्षा विशेष म्हणजे पाटील स्वतः गाडी चालवत गारटकरांसोबत इंदापूर शहरातून फेरफटका मारून आले. त्यामुळे या संपूर्ण प्रसंगाने राजकीय चर्चेला आणखी हवा मिळाली.

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

2029 मध्ये नवे समीकरण?

इंदापूर तालुक्यात आगामी काळात कोणती राजकीय आघाडी आकार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि भाजपचे प्रवीण माने हे तीन प्रमुख चेहरे एकत्र आले, तर इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषतः 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे तिन्ही नेते एकाच राजकीय व्यासपीठावर येतात का, याची उत्सुकता वाढली आहे.

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?
Politics: मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी, मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र; राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com