Kalyan - Dombivli Politics : भाजप-शिंदेसेना महायुती तुटणार? मनसेवरून मिठाचा खडा; संघर्ष चिघळण्याची शक्यता

Kalyan Dombivli Mahayuti conflict over MNS role : कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या सत्तेतील सहभागावरून भाजप आणि शिंदेसेनेत संघर्षाची शक्यता आहे. भाजपने मनसेला सत्तेबाहेर करण्याची मागणी केली आहे.
BJP - Shinde sena yuti : भाजप-शिंदेसेना युती तुटण्याची शक्यता, कल्याण-डोंबिवलीतील राजकारण तापलं
कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिंदेसेनेत संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.saam TV
Published On
Summary
  • कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेवरून भाजप शिंदेसेनेत संघर्ष

  • मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याची भाजपची मागणी

  • मनसेच्या सहभागावरून भाजपचे शिंदेसेनेला थेट पत्र

  • आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही | कल्याण

BJP Shiv Sena conflict over MNS in KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तासंघर्ष चिघळण्याची दाट शक्यता आहे. मनसेवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मिठाचा खडा पडला आहे. मनसेला सत्तेबाहेर काढण्याची मागणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावर शिंदेसेनेकडूनही प्रत्युत्तर आले होते. त्यानंतर आज उपमहापौरांच्या दालनात भाजप पदाधिकारी आणि आमदार सुलभा गायकवाड यांची बैठक आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि भाजपकडून कोणता निर्णय घेतला जातोय, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील (KDMC Mahayuti Politics) महायुतीच्या सत्ताकारणात मनसेच्या भूमिकेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांनी काल शिंदेसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र दिलं. मनसेला सत्तेतून तात्काळ बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली होती.

मनसेबाबत शिवसेनेने (MNS-Shivsena) आपली भूमिका स्पष्ट करावी, असा थेट सवालही या पत्रातून परब यांनी उपस्थित केला होता. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदेगटाची आघाडी असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताकारणात मनसेच्या सहभागावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे या पत्रातून स्पष्ट झाले.

BJP - Shinde sena yuti : भाजप-शिंदेसेना युती तुटण्याची शक्यता, कल्याण-डोंबिवलीतील राजकारण तापलं
मोठी बातमी! KDMC रुग्णालयांमध्ये मोठा फेरबदल; ९ डॉक्टरांच्या तडकाफडकी बदल्या

मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास भाजपला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही भाजप जिल्हाध्यक्षांनी दिल्याने महायुतीतील अंतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे. आज कल्याण-डोंबिवली महापालिकेतील उपमहापौर दालनात भाजप पदाधिकारी आणि भाजप आमदार सुलभा गायकवाड यांची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत मनसेबाबत भाजपची पुढील भूमिका, महापालिकेतील सत्तासमीकरण आणि शिंदेसेनेसोबतच्या संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

BJP - Shinde sena yuti : भाजप-शिंदेसेना युती तुटण्याची शक्यता, कल्याण-डोंबिवलीतील राजकारण तापलं
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com