Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

Pimpari-Chinchwad Political News: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आमने-सामने आला आहे. राष्ट्रवादीने भाजपवर गंभीर आरोप केला.
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?
Pune PoliticsSaam Tv
Published On
  • पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपवर गंभीर आरोप

  • योगेश बहल यांची महापौर आणि आयुक्तांना कायदेशीर नोटीस

  • पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपकडून बेकायदेशीर सभा घेतल्याचा आरोप

  • भाजप राष्ट्रवादीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून वाद

राज्य आणि केंद्र पातळीवर सत्तेत एकत्र असणारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. स्वीकृत नगरसेवक निवडीवरून आधीच दोन पक्षांत ताणतणाव निर्माण झालेला असताना आता सत्ताधारी भाजपकडून बेकायदेशीर रित्या सभा घेऊन कोट्यवधी रुपयांचे विषय मंजूर केले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक योगेश बहल यांनी थेट पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना कायदेशीर नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी प्रशासकीय आणि सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर तीव्र आक्षेप घेत भाजप नियमांची पायमल्ली करत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना भाजप शहराध्यक्ष आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी राष्ट्रवादीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही महापालिकेत पूर्णपणे नियमानुसार आणि लोकहिताचेच विषय मंजूर करत असून राष्ट्रवादीचे नेते केवळ राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, अशी खरमरीत टीका काटे यांनी केली आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही मित्रपक्षांतील वाद विकोपाला गेला असतानाही दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याकडे दुर्लक्ष का करत आहेत?, असा सवाल आता नागरिक आणि राजकीय विश्लेषकांमधून उपस्थित केला जात आहे.

Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?
Politics : मुख्यमंत्री बदलणार का? काँग्रेस अध्यक्षांचा ऑन द स्पॉट फैसला, राजकीय वर्तुळातील वावटळ शांत

बुलडाण्यात महायुतीत अंतर्गत वाद?

बुलडाण्यात भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचे पती आणि मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी निघालेल्या रॅली दरम्यान भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला. विशेष म्हणजे, याचवेळी त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवत नेमकं कुणाला खुणावलं? याची चर्चा आता बुलडाणा शहरात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यात राजकीय कुरघोडी सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच आता रॅलीतील या कृतीमुळे बुल़डाण्यात महायुतीत ‘ऑल इज वेल’ आहे का? असा प्रश्न पडला आहे.

Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?
Raigad politics : खासदार सुनील तटकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का; सख्खे व्याही शिंदेंच्या शिवसेनेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com