Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

Big Blow to Uddhav Thackeray’s Shiv Sena: शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. हा ठाकरेसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्
Uddhav ThackeraySaam Tv
Published On
  • उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का

  • विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द

  • विशाखा राऊत पुढील सहा वर्षांसाठी निवडणुकीसाठी अपात्र

  • विशाखा राऊत यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप

  • प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती

गिरीष कांबळे, मुंबई

मुंबईतील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. ठाकरेसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. लवकरच महापालिका सभागृहात याबाबत जाहीर करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचं नगरविकास विभागाला पत्राद्वारे माहिती देण्यात आली. विशाखा राऊत या पुढील सहा वर्षे नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र आहेत असा आयुक्तांनी पत्रात उल्लेख केला आहे.

प्रभाग क्रमांक १९१ हा मागास प्रवर्ग (महिला) राखीव असल्याने या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी विशाखा राऊत यांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, त्यांच्याविरोधात निवडणूक लढलेल्या प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावरच आक्षेप घेतला. प्रिया सरवणकर यांनी याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करून विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राच्या दाव्याची पडताळणी करण्याची मागणी केली होती.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्
Kalyan - Dombivli Politics : भाजप-शिंदेसेना महायुती तुटणार? मनसेवरून मिठाचा खडा; संघर्ष चिघळण्याची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १९१ हा केवळ महापालिकेचा एक प्रभाग नाही, तर शिवसेनेच्या राजकीय इतिहासाशी जोडलेला परिसर आहे. सेनाभवन, शिवाजी पार्क आणि सिद्धिविनायक मंदिराचा परिसर यामुळे दादर-माहिमच्या राजकारणात या भागाला विशेष महत्त्व आहे शिवसेनेची स्थापना झाल्यापासून दादर हा पक्षाच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला. सेनाभवन हे शिवसेनेचे प्रमुख राजकीय-संघटनात्मक केंद्र, तर शिवाजी पार्क हे पक्षाच्या मोठ्या सभा आणि दसरा मेळाव्यांमुळे शिवसेनेच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचे प्रतीक बनले. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक निवडणूक ही केवळ स्थानिक राजकीय लढत न राहता शिवसेनेच्या प्रभावाची चाचणी ठरते.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

शिवसेनेतील फुटीनंतर या राजकीय महत्त्वाला आणखी धार आली. ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये शिवसेनेच्या वारशावरून सुरू असलेल्या संघर्षाची छाया दादरच्या राजकारणावरही पडली. त्यामुळे पारंपरिक शिवसेना प्रभावक्षेत्रातील एखादी जागा कोणाच्या ताब्यात जाते, याकडे दोन्ही गटांचे विशेष लक्ष असते. प्रभाग १९१ मधील लढतीत हेच चित्र स्पष्टपणे पाहायला मिळाले. एका बाजूला शिवसेना (UBT)च्या विशाखा राऊत, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या प्रिया सरवणकर मैदानात होत्या. प्रिया सरवणकर या माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या असल्याने सरवणकर कुटुंबाची राजकीय ताकद त्यांच्या मागे होती. त्यामुळे या लढतीत अनुभवी नेतृत्व विरुद्ध नव्या पिढीचा राजकीय चेहरा, तसेच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी दुहेरी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्
Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

या पार्श्वभूमीवर प्रभाग १९१चा निकाल अधिक महत्त्वाचा ठरतो. दादरच्या या पारंपरिक शिवसेना प्रभावक्षेत्रात ठाकरे गटाने आपली पकड कायम ठेवली, असा राजकीय संदेश या निकालातून दिला गेला. २०२६च्या निवडणुकीत या प्रभागातून विशाखा राऊत (शिवसेना-UBT) विजयी झाल्या. त्यांनी १३,२३६ मते मिळवली, तर प्रिया सरवणकर यांना १३,०३९ मते मिळाली. फरक फक्त १९७ मतांचा होता. विशेष म्हणजे, ही लढत अत्यंत अटीतटीची झाली. त्यामुळे काहीशे मतांचाही फरक या प्रभागाच्या राजकीय वजनाच्या तुलनेत मोठा संदेश देणारा ठरतो.

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्
Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com