एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

eknath shinde news : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील बडा नेता नाराज झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
eknath shinde news
nashik news Saam tv
Published On
Summary

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग

शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याची चर्चा

शिवसेनेतील बडा नेता नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

राज्यात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडी सुरू आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत. काही तासांपूर्वी ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दुसरीकडे नाशकात शिंदेंच्या शिवसेनेचा बडा नेता नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. बड्या नेत्याच्या नाराजीच्या चर्चांमुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

eknath shinde news
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेकडून हा माजी मंत्री विधानपरिषदेवर जाणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडी थांबेना झाल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चे बांधणीस सुरूवात केली आहे. शिंदे गटानेही आज सोमवारी नाशिकमध्ये संघटना बांधणीची राज्यातील पहिली बैठक आयोजित केली होती.

eknath shinde news
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेकडून हा माजी मंत्री विधानपरिषदेवर जाणार

पहिल्याच बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे. हेमंत गोडसे नाशिकमध्ये असूनही बैठकीला न आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नव्या कार्यकारिणीत हेमंत गोडसेंना संधी न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.

eknath shinde news
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे ६ खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

तत्पूर्वी, नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि आमदार, खासदार नगराध्यक्ष, उपमहापौर नगरसेवक यांच्या बैठका सुरू आहेत. संघटना बांधणीसाठी श्रीकांत शिंदे आज सोमवारपासून राज्यभरात लोकसभा निहाय बैठका घेत आहे. या बैठक, राजकीय भेटीगाठीदरम्यान हेमंत गोडसेंची अनुपस्थिती दिसून चर्चांना उधाण आलं आहे. हेमंत गोडसेंच्या अनुपस्थितीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'हेमंत गोडसे यांचं वैयक्तिक काम होते, म्हणून ते उपस्थित नव्हते. माझं संपर्क त्यांच्याशी बोलणं झालंय, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com