Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड! भुसवळच्या बड्या नेत्यासह अनेक तरुण-तरुणींचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Political News : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगावराजा येथे मुस्लिम समाजातील शेकडो तरुण-तरुणी आणि महिलांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
Shinde Sena’s Muslim Connect Gains Momentum In Sindkhed Raja, Buldhana
Shinde Sena’s Muslim Connect Gains Momentum In Sindkhed Raja, BuldhanaAI Image
Published On
Summary
  • बुलढाण्यात मोठी राजकीय घडामोड

  • सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगावराजा येथे मुस्लिम समाजातील महिलांनी शिंदेसेनेत प्रवेश केला

  • आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पडला पार

बुलढाणा जिल्ह्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेने मुस्लिम समाजाशी संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे राजकीय पाऊल टाकले आहे. देऊळगावराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मुस्लिम समाजातील शेकडो युवक-युवती आणि महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. परभणीचे शिवसेना आमदार सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान भुसावळमध्ये देखील प्रहारच्या ४ नेत्यांनी देखील शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महापालिकेचं महापौरपद अडीच वर्षांनंतर शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार महापौर पदासाठी शिंदेसेनेकडून महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशातच आता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेत मुस्लिम समाजातील शेकडो तरुण तरुणींसह महिलांनी पक्षप्रवेश केला. तरुण आणि तरुणींसोबत महिलांचाही पक्षप्रवेश झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये याची नोंद घेतली जात आहे.

Shinde Sena’s Muslim Connect Gains Momentum In Sindkhed Raja, Buldhana
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विविध समाजघटकांमध्ये पक्षाचा जनसंपर्क वाढवण्यावर शिवसेनेकडून भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर देऊळगावराजा येथील हा पक्षप्रवेश सोहळा महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः मुस्लिम समाजातील महिला आणि तरुणांचा पक्षातील सहभाग वाढल्याने स्थानिक पातळीवर शिवसेनेला त्याचा राजकीय फायदा मिळू शकतो का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आमदार सईद खान यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे मुस्लिम समाजाशी संवाद आणि संपर्क वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न अधिक स्पष्ट झाला आहे. पक्षात प्रवेश केलेल्या तरुण तरुणी आणि महिलांमुळे स्थानिक संघटनात्मक ताकद वाढण्याची अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Shinde Sena’s Muslim Connect Gains Momentum In Sindkhed Raja, Buldhana
Karlyacha Juice : डायबिटीजला आता बोला बाय बाय! कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने 'हे' ६ आजार पळतील दूर

देऊळगावराजा येथील या पक्षप्रवेशानंतर सिंदखेडराजा मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मुस्लिम समाजातील नव्या चेहऱ्यांचा शिवसेनेत झालेला प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विधानसभा राजकारणात कितपत प्रभावी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे शिंदे सेनेचा हा ‘मुस्लिम कनेक्ट’ आगामी काळात मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Shinde Sena’s Muslim Connect Gains Momentum In Sindkhed Raja, Buldhana
LPG Cylinder : ....तर १ ऑक्टोबरपासून बंद होणार सिलिंडर, ४ लाख पुणेकरांना सरकारचा इशारा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

भुसावळच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड

भुसावळच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्रीताई भंगाळे आणि निखिल चौधरी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भुसावळमध्ये शिवसेनेची राजकीय आणि संघटनात्मक ताकद वाढण्याची चर्चा सुरू झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता भुसावळच्या राजकारणातील पुढील डावपेचांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com