LPG Cylinder : ....तर १ ऑक्टोबरपासून बंद होणार सिलिंडर, ४ लाख पुणेकरांना सरकारचा इशारा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pune PNG Connection LPG Cylinder Update News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील LPG सिलिंडर वापरणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. सोसायटीत PNG पाइपलाइन उपलब्ध असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी PNG जोडणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Pune LPG Users PNG Connection Required Before September 30
Pune LPG Users PNG Connection Required Before September 30AI Image
Published On
Summary
  • पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ४ लाख सदनिकाधारकांसाठी महत्त्वाची अपडेट

  • तुमचा LPG सिलिंडर १ ऑक्टोबर पासून बंद होण्याची शक्यता

  • सोसायटीत PNG पाइपलाइन उपलब्ध असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी PNG जोडणी करून घेणे आवश्यक

  • सरकारचा नागरिकांना इशारा

सचिन जाधव, पुणे

नागरिकांनो तुमच्या घरी सुद्धा सिलिंडरचं कनेक्शन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. सप्टेंबर महिन्याच्या ३० तारखेपर्यंत जर तुम्ही पीएनजीची जोडणी केली नसेल तर ती करावी लागणार आहे. कारण १ ऑक्टोबरपासून तुम्हाला होणार सिलिंडरचा पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे चार लाख सदनिकाधारकांना पीएनजी जोडणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

...तर १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील ज्या सोसायटीच्या आवारात पीएनजीची पाईप लाईन उपलब्ध आहे, परंतु अद्यापही त्याची जोडणी केलेली नाही; अशा घरांबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित घरांनी येत्या ३१ सप्टेंबर पर्यंत पीएनजी जोडणी करून न घेतल्यास १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या कुटुंबांना या निर्णयाची दखल घेणे गरजेचे आहे.

Pune LPG Users PNG Connection Required Before September 30
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

पुणेकरांना सरकारचा इशारा

आखाती युद्धामुळे पेट्रोल तसेच गॅस टंचाई निर्माण झाली होती. दरम्यान भविष्यात असा प्रकार घडू नये आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे निर्देश जारी करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत एलपीजी नियंत्रण आदेश अधिसूचित करण्यात आला आहे. या आदेशानुसार, ज्या भागात पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे, तेथे ग्राहकांनी पीएनजी जोडणे आवश्यक आहे.

Pune LPG Users PNG Connection Required Before September 30
Karlyacha Juice : डायबिटीजला आता बोला बाय बाय! कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्याने 'हे' ६ आजार पळतील दूर

४ लाख सदनिकाधारकांनो आजच करा अर्ज

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पीएनजीची पाईप लाईन आधीच उपलब्ध आहे. मात्र, अनेक कुटुंबांकडून अद्याप एलपीजी सिलिंडरचा वापर केला जात आहे. अशा ग्राहकांनी आता संबंधित पीएनजी कंपनीकडे अर्ज करून जोडणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान, अंतिम मुदत जवळ येत असल्याने नागरिकांनी शेवटच्या क्षणी गर्दी होण्याची वाट न पाहता लवकरात लवकर पीएनजी जोडणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com