Alisha Khedekar
छातीत दडपण, जडपणा, आवळल्यासारखे वाटणे किंवा सौम्य वेदना वारंवार जाणवू शकतात. हा त्रास काही वेळ येऊन पुन्हा कमी होऊ शकतो.
पुरेशी झोप घेतल्यानंतरही अचानक जास्त थकवा जाणवणे, रोजची कामे करताना अशक्तपणा वाटणे किंवा ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटणे दुर्लक्ष करू नका.
थोडे चालल्यानंतर किंवा नेहमीची कामे करतानाही धाप लागणे, श्वास फुलणे किंवा छातीत जडपणा जाणवणे हे महत्त्वाचे संकेत ठरू शकतात.
कोणतेही विशेष कारण नसताना थंड घाम फुटणे, विशेषतः छातीत अस्वस्थता किंवा अशक्तपणासोबत घाम येणे, हे गंभीरपणे घेणे आवश्यक आहे.
अचानक गरगरणे, डोके हलके वाटणे किंवा उभे राहताना अस्थिरपणा जाणवणे काही वेळा हृदयाशी संबंधित समस्येचा संकेत असू शकतो.
नेमके कारण समजत नसतानाही बेचैनी, कमजोरी किंवा शरीर ठीक नसल्याची भावना वारंवार जाणवू शकते. विशेषतः इतर लक्षणांसोबत असल्यास तपासणी महत्त्वाची आहे.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा