

Summary -
सोलापुरात राजू खरे यांनी अजित पवारांसमोर खळबळजनक विधान केलं
हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांच्या 'करेक्ट कार्यक्रम झाल्याचा उल्लेख त्यांनी केला
दादांच्या नादाला लागलं की कार्यक्रम होतोच असं ते म्हणाले
महत्वाचे म्हणजे अजित पवारांसमोर त्यांनी हे विधान केले
'दादांच्या नादाला लागलं की करेक्ट कार्यक्रम होतोच', असं खळबळजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी सोलापुरात केले. अजित पवारांसमोरचं त्यांनी हे विधान केल्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. त्याच्या या सभेतील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी उदाहरण देताना राजू खरे यांनी विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील यांची नावं देखील घेतली.
उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजू खरे मोठं विधान केलं. यावेळी त्यांनी वजनावरून व्यथा मांडताना सांगितले की, 'दादा आपण दिलेला शब्द पाळता हे सर्व महाराष्ट्र जाणतो. दादांच्या नादाला लागणारे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील करेक्ट कार्यक्रम, पुरंदरमध्ये शिवतारे बापू करेक्ट कार्यक्रम. त्यामुळे दादाने एकदा ठरवले की त्याचा करेक्ट कार्यक्रम होतो.', असे विधान राजू खरे यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर सभेत हशा पिकला.
यावेळी राजू खरे यांनी नाव न घेता राजन पाटील यांच्यावर निशाणा साधला. 'दादांनी मोहोळ तालुक्याला ४ हजार रुपये कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र तरीही तुमची भूक एवढी मोठी होती. त्यांना १० हजार कोटी पाहिजेत म्हणून ते आता भाजपात गेले आहेत. यामुळे दादा आता त्यांच्याकडून तुम्हाला आव्हान दिले जात आहे. दादा ही लोक आपल्यासोबत होते तर निवडणूक बिनविरोध व्हायची. मात्र त्यांनी आपणाला सोडलं म्हणून अनगरमध्ये निवडणूक लागली.'
तसंच, 'उमेश पाटील आणि काका साठे आज तुमच्याबरोबर आहेत. हे दोघे ही विधानसभेला माझ्याबरोबर होते म्हणून मी आमदार झालो. त्यामुळे या तालुक्याला तुम्हाला दत्तक घ्यावे लागेल. मला वजनावरून या लोकांकडून हिनवले गेले म्हणून मी सर्जरी करून घेतली. डायरेक्ट २६ किलो वजन कमी केलं. आता हिनवले जातंय की, आमदार म्हणून मी काय निधी आणला, आमदार म्हणून ५ कोटीच्या पुढे दादा माझ्याकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी माझ्याकडे लक्ष द्या.', असं देखील राजू खरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.