Election Commission:
saam tv

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार; मनसे नेत्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, तर बहिणीचा बदलला धर्म

Election Commission: मतदार यादीतील आणखी एक नवीन घोळ समोर आलाय. मनसे नेत्याचे नाव बंगाली भाषेत लिहिण्यात आलंय. तर मतदार यादीत त्यांच्या बहिणीचा धर्म बदलण्यात आल्याचा प्रकार घडलाय. राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत.
Published on
Summary
  • मतदार यादीनं मनसे नेत्याचं नाव बंगाली भाषेत तर बहिणीचा धर्म मुस्लिम नोंदवला.

  • मुंबईत ११ लाखांपर्यंत दुबार मतदार असल्याचा आरोप आधीच गाजतोय.

  • विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मतदारयाद्यांमधीळ घोळामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलेत. दुबार नावे, कोणत्या पत्त्यावर कोणत्याच मतदारांची नावे असल्यानं काँग्रेस खासदार राहुल गांधींसह राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. एकीकडे मुंबईत दुबार मतदारांची संख्या ११ लाख असल्याचं स्पष्ट झालंय. त्याचवेळी मतदार यादीमध्ये आपल्या नावाने बोगस मतदार तयार केल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केला.

दुबार मतदार असल्याचा घोळ असतानाच आता नवा घोळ समोर आलाय. मतदार यादीत मनसे नेत्याचं नाव बंगाली भाषेत लिहिण्यात आलंय. तर त्यांच्या बहिणीचा धर्म बदलत त्यांचे नाव मुस्लीम धर्मानुसार लिहिलंय. मनसेच्या अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी (Manish Dhuri MNS) यांच्या नावाचा घोळ समोर आलाय.

Election Commission:
Raj Thackeray : "मराठी माणसाला वापरून फेकून द्यायचं"; राज ठाकरे संतापले, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'वर काय म्हणाले?

मनसेच्या अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी (Manish Dhuri MNS) यांच्या नावाचा घोळ समोर आलाय. मनीष धुरी यांच्या फोटोसमोर बंगाली व्यक्तीचं नाव आहे. तर त्यांच्या बहिणीच्या फोटोसमोर एका मुस्लिम महिलेचं नाव लिहिण्यात आलंय. या घोळावरून मनसे नेत्यानं निवडणुक आयोगाला जाब विचारलाय. मतदार यादीमधील घोळ निस्तारला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिलाय.

Election Commission:
Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

मनसेचे अंधेरी पश्चिम विधानसभाचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांनी २००९ आणि २०२४ साली विधानसभा निवडणूक लढवली. सध्या या मतदारसंघात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम हे आमदार आहेत. अंधेरी पश्चिम मतदारसंघात वार्ड क्रमांक ६९ मध्ये यादी क्रमांक २७२ मध्ये हा घोळ झालाय. सध्या या मतदारसंघात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम हे आमदार आहेत. अंधेरी पश्चिम मतदारसंघात वार्ड क्रमांक ६९ मध्ये यादी क्रमांक २७२ मध्ये हा घोळ झालाय.

मनसेचे नेते मनीष धुरी यांच्या फोटोसमोर दास भुटो सुकुमार असं बंगालीमध्ये नाव लिहिण्यात आलंय. त्याचवेळी त्यांच्या बहिणीच्या फोटोसमोर शेख निशा यतिम असं नाव लिहिण्यात आलीय. या प्रकारामुळे मनसेचे नेते मनीष धुरी यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. या प्रकरणात मनसेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या आधी राज ठाकरे यांनीही मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हा घोळ कसा करण्यात आला हे आताच्या प्रकरणावरुन समोर येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com