Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडला

Pune News : पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालय परिसरात धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडल्याची घटना समोर आली आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित; चौकशी आणि कारवाईची मागणी.
YCM Hospital Ambulance Incident Patient Falls in Pimpri-Chinchwad
YCM Hospital Ambulance Incident Patient Falls in Pimpri-ChinchwadAI Image
Published On: 
Summary
  • पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडला

  • परिसरातील नागरिकांनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले

  • रुग्णवाहिका चालकाला नागरिकांनी जाब विचारत सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) रुग्णवाहिकेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. रुग्णालय परिसरात धावत्या रुग्णवाहिकेतून एक बेवारस रुग्ण खाली पडल्याची घटना घडली. या प्रकारामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेतून प्रवास करत असताना संबंधित रुग्ण अचानक खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे दृश्य परिसरातील काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले. त्यानंतर नागरिकांनी रुग्णवाहिका चालकाला जाब विचारत या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. रुग्णाला रुग्णवाहिकेतून नेताना आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का, तसेच रुग्णवाहिकेचे दरवाजे आणि सुरक्षाव्यवस्था योग्य स्थितीत होती का, असे प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहेत.

YCM Hospital Ambulance Incident Patient Falls in Pimpri-Chinchwad
Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

रुग्ण खाली पडल्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका चालक आणि एक पोलीस कॉन्स्टेबल पुन्हा आल्याचेही दिसून आले. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी संबंधित रुग्णवाहिका चालक आणि वायसीएम रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत रुग्णाला गंभीर दुखापत झाले नाही. मात्र, त्याला पुन्हा रुग्णालयात नेऊन उपचार देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

YCM Hospital Ambulance Incident Patient Falls in Pimpri-Chinchwad
Tea Tips : चहासोबत चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ! नाहीतर आजारांना मिळेल आमंत्रण

दरम्यान, रुग्णवाहिकेतून रुग्णाची वाहतूक करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे आणि यामध्ये निष्काळजीपणा झाला आहे का, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करणार, तसेच वायसीएम रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेबाबत काय स्पष्टीकरण दिले जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com