Pune ST Bus Accident: पुण्यात भरधाव एसटीचा अचानक ब्रेक फेल, ७ वाहनांना उडवले

Pune ST Bus Accident: पुण्यात भरधाव एसटीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्यााने अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Pune ST Bus Accident:
Pune ST Bus Accident: Saam tv
Published On

अक्षय बडवे

Pune ST bus Accident News:

पुण्यात भरधाव एसटीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव एसटी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्यााने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या एसटीने रस्त्यावरील ७ वाहनांना उडवले आहे. या अपघातात सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील फातिमा नगर भागात मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील फातिमा नगर भागात जात असलेल्या भरधाव एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. भरधाव एसटीचा अचानक ब्रेक झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री ही अपघाताची घटना घडली.

या अपघातात आठ वर्षीय मुलासह सहा जण जखमी असल्याची माहिती आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघात प्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune ST Bus Accident:
Nagpur News: भरकटलेले विमान महिला पायलटने 'टॅक्सी वे'वर उतरवलं; लँडिंगनंतर परिसरात एकच खळबळ

नेमकं काय घडलं?

एसटी बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात होती. त्यावेळी फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. या भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली.

Pune ST Bus Accident:
Nagpur News: धक्कादायक! तरुणाचा विनातिकीट प्रवास, टीसीने नियम सांगताच धावत्या रेल्वेतून मारली उडी

या अपघातात मोटारीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, या अपघातात अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी एसटी चालकाला ताब्यात घेतले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Pune ST Bus Accident:
Pandharpur Kartiki Mahapuja: उपमुख्यमंत्र्यांचा कार्तिकी महापूजेचा मार्ग मोकळा; मागणी मान्य झाल्यानंतर मराठा समाजाचे आंदोलन मागे

अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी

पुण्यातील फातिमानगर परिसरात अपघात झाल्यानंतर या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. या बसमध्ये ३० प्रवासी प्रवास करत होते.

अपघात झाल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी घाबरले. घटनेनंतर त्यांनी आरडण्यास सुरुवात केली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com