पराग ढोबळे
गोंदिया फ्लाईंग क्लबचे प्रशिक्षण देणारं विमान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर न उतरता चक्क मिहानच्या 'टॅक्सी वे' वर उतरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. सुदैवाने सेफ लँडिंग झाल्यानं मोठी दुर्घटना टळली. मंग मात्र लँडिगनंतर एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या इंदिरा गांधी उड्डाण अकॅडमीच्या महिला पायलटने गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून झेप घेतली होती. हे विमान नागपूर विमानतळावर उतरून परत गोंदियाला जाणार होतं.
एअर ट्रॅफिक कंट्रोलरचा विमानाशी संपर्क तुटल्याने शोध सुरू झाला. त्यानंतर विमान मिहानमध्ये 'टॅक्सी वे' वर उतरल्याचं समोर आलं. या विमानासाठी फ्लाईंग क्लबचे अधिकारी दुपारनंतर नागपुरात दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पुन्हा या विमानाने गोंदियाकडे झेप घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रशिक्षण विमान देणारं भरकटल्याने संबंधित यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली होती. इंदिरा गांधी उड्डाण अकॅडमीच्या अधिकाऱ्यांना विमान रनवे-वे वर लँडिग झाल्याची माहिती काल दुपारी १ वाजता कळाली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित क्लबचे अधिकारी तातडीने ३ वाजण्याच्या सुमारास नागपुरात पोहचले. या अधिकाऱ्यांनी महिला पायलटशी संपर्क साधत माहिती जाणून घेतली. त्यानंतर अन्य पायलटने विमानासह रात्री ८ च्या सुमारास गोंदियाकडे झेप घेतली.
तत्पूर्वी, गोंदियामधील दुसऱ्या फ्लाईंग क्लबचं एक विमान मार्च २०२३ मध्ये बालाघाट जिल्ह्यातील किरणापूरजवळ एका पर्वताला धडकलं होतं. या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला होता. त्याआधी २०१७ साली एका प्लाईंग क्लबचे विमान वैनगंगा नदीत कोसळून दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत पायलटसह प्रशिक्षकाचाही मृत्यू झाला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.