Vijay Wadettiwar: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करत आहेत? दुष्काळाच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांचा सवाल

महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दुष्काळ निवारणासाठी काय करत आहेत? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक सवाल केला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSaam tv

Mumbai News:

राज्यात दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून शेजारील राज्याचा दाखला देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. कर्नाटक राज्याने दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारला निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र यावरून महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दुष्काळ निवारणासाठी काय करत आहेत? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक सवाल केला आहे. (Latest Marathi News)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, 'दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नाही. मंत्रिमंडळाने उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग आहे. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना गलथानपणा केल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे'.

Vijay Wadettiwar
Akola News: अकोल्यात कॉंग्रेसला धक्का! जिल्हाउपाध्यक्ष संजय बोडखे यांचा तडकाफडकी राजीनामा

'राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळाने उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही, याचं उत्तर सरकारने जनतेला दिले पाहीजे. राज्याला खड्ड्यात घालणाऱ्या सरकार, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे. त्याशिवाय आपल्याच धुंदीत असलेल्या सरकार आणि निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना जाग येणार नाही, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'राज्य सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे राज्याला 4 ते 5 हजार कोटींचा भुर्दंड बसणार आहे. केंद्राची मदत आता राज्याला मिळणार नाही. एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे निधी मिळणे अवघड आहे. शेजारच्या कर्नाटक राज्याने दुष्काळ निवारणाचे सर्व काटेकोर नियोजन केलं आहे. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकाला निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. जर कर्नाटकला हे जमत असेल तर महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काय करत आहेत? असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

Vijay Wadettiwar
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त पंढरपुरात ३ हजार पोलीसांचा राहणार वाॅच, बंदोबस्तासाठीची ऑनलाइन प्रणाली विकसीत

'केंद्रावर आर्थिक भार पडू नये, केंद्रीय मंत्री अमित शहा नाराज होऊ नये यासाठी राज्य शासनाने जाणीवपूर्वक ही चूक केली का, अशी शंका निर्माण होते. सरसकट दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आम्ही वारंवार केली, तरी देखील सरकारने चालढकल केल्याचे चित्र आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com