Pandharpur Kartiki Mahapuja: उपमुख्यमंत्र्यांचा कार्तिकी महापूजेचा मार्ग मोकळा; मागणी मान्य झाल्यानंतर मराठा समाजाचे आंदोलन मागे

Pandharpur News : पंढरपुरातील सकल मराठा समाजाने केलेल्या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका
Pandharpur Kartiki Mahapuja
Pandharpur Kartiki MahapujaSaam tv
Published On

पंढरपूर : मराठा आरक्षणासाठी कार्तिकी एकादशीच्या दिवशी उपमुख्यामंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होऊ (Pandharpur) देण्यास मराठा समाजाने विरोध दर्शविला होता. यामुळे पूजा होणार कि नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र (Kartiki Ekadashi) कार्तिकीच्या महापूजेच्या विरोधातील सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे घेतल्याने आता महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे. (Breaking Marathi News)

Pandharpur Kartiki Mahapuja
Nanded Crime: शेतमजुराच्या घरावर दरोडा; तीन तोळ्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने लंपास, मारहाणीत दाम्पत्य जखमी

कार्तिकी एकादशी दोन दिवसांवर आहे. पंढरपुरात भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान मराठा समाज आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह काही मागण्यासाठी आक्रमक झालेला होता. शिवाय कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी महापूजेला विरोध दर्शविला होता. मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने आज पुन्हा बैठक बोलवली होती. या बैठकीत आज पंढरपुरातील सकल मराठा समाजाने केलेल्या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधातील आंदोलन मागे घेतले आहे. परिणामी कार्तिकीच्या महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pandharpur Kartiki Mahapuja
KDMC News : बिल्डरांना केडीएमसीचा दणका; २५ बिल्डरांना पाठवल्या नोटिस ,एका बिल्डरचे बांधकाम बंद

या मागण्या झाल्या मान्य 
प्रशासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुसऱ्यांदा बैठक बोलावली. यात मराठा भवन बांधून द्यावेत, सार्थी संस्थेचे पंढरपुरात उपकेंद्र सुरू करावे, विद्यार्थी वस्तीगृह सुरू करावे, आरक्षणासंदर्भात (Maratha Aarkshan) चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सकल मराठा शिष्ट मंडळाशी चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा. आदी मागण्या मान्य केल्या. यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकीच्या शासकीय महापूजेला सकल मराठा समाजाचा  हिरवा कंदील दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com