Kartiki Ekadashi Mahapuja : कार्तिकीच्या शासकीय महापूजेला कोळी समाजाचाही विरोध‌

Pandharpur News : पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीला उपमुख्यामंत्रीच्या हस्ते शासकीय पूजा केली जात असते. परंतु कोळी समाज बांधवांची आज पंढरपुरात बैठक घेत बैठकीतनंतर सदरचा निर्णय घेण्यात आला
Kartiki Ekadashi Puja
Kartiki Ekadashi PujaSaam tv
Published On

पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पंढरपुरात विठूरायाची पूजेचा मन उपमुख्यमंत्र्याचा असतो. मात्र यंदा होणाऱ्या विठ्ठलाच्या (Kartiki Yatra) शासकीय महापूजेला मराठा क्रांती मोर्चाने यापूर्वीच विरोध केला आहे. यानंतर आता महादेव कोळी समाजाने ही उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूरला (Pandharpur) येण्यास विरोध केल्याने वादात आणखी भर पडली आहे. (Breaking Marathi News)

Kartiki Ekadashi Puja
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा; जिल्ह्यात केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांनीच पिके केले संरक्षित

कार्तिकी एकादशी तीन दिवसांवर आली आहे. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीला (Kartiki Ekadashi) उपमुख्यामंत्रीच्या हस्ते शासकीय पूजा केली जात असते. परंतु कोळी समाज बांधवांची आज पंढरपुरात बैठक घेत बैठकीतनंतर सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला यापूर्वीच विरोध केला आहे. अशातच आता  कोळी समाजाने ही विरोध केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kartiki Ekadashi Puja
Chandrapur Crime: पोलीसच निघाला चोर; कर्ज फेडण्यासाठी पत्करला घरफोडीचा मार्ग

पंढरपूमध्ये कोणालाही पाय ठेवू देणार नाही 

कोळी समाजाला महादेव कोळी असा जातीचा दाखला मिळावा; अशी मागणी आहे. जोपर्यंत सरकार आमची मागणी पूर्ण करणार नाही, तोपर्यंत एकाही मंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही; असा इशारा महर्षी वाल्मीकी संघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आज दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com