भाऊ झाला वैरी! किरकोळ कारणावरून झालं भांडण अन् तरूणानं भावाच्या मानेवर कोयत्याने केले सपासप वार

Brother Kills Cousin Urse Pune: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील उर्से गावात भावानेच चुलतभाऊ यशवंत निषाद याचा कोयत्याने खून केला. पोलिस तपास सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Police at the scene of a fatal machete attack in Urse village, Pune
Police at the scene of a fatal machete attack in Urse village, PuneSaam Tv
Published On

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उर्से गावातील जय मल्हार मंदिराजवळील एका सोसायटीत भावानेच चुलत भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

Police at the scene of a fatal machete attack in Urse village, Pune
Accident News : भरधाव कारने ६ जणांना चिरडलं, चिमुकल्याचा जागीच मृत्यू; ५ गंभीर जखमी, अपघाताचा थरारक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार यशवंत जगदीश निषाद (वय 30, उर्से, झारखंड) आणि आरोपी डिकेश होळकर निषाद (वय 27, उर्से, छत्तीसगड) यांच्यात रात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान घरगुती कारणावरून भांडण झाले. भांडणाच्या तणावात आरोपी डिकेश होळकर निषाद यांनी कोयत्याने यशवंत निषाद यांच्या मानेवर वार केला. यात यशवंत निषाद जागीच ठार झाला.

Police at the scene of a fatal machete attack in Urse village, Pune
Kolhapur : कळंब कारागृहात रक्तरंजित थरार, आरोपीकडून २ पोलिसांवर हल्ला, नेमकं कारण काय?

शिरगाव परंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवला आहे. सध्या परंदवाडी शिरगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Police at the scene of a fatal machete attack in Urse village, Pune
Crime News : धक्कादायक! कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं; ११ महिन्यांत ३० वेळा बलात्कार

लोणावळामध्ये तरुणाची आत्महत्या

लोणावळ्यातील टायगर पॉईंट वर एका 32 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. नेमकं आत्महत्येचे कारण काय हे समजू शकले नाही. वीरेंद्र सिंग वय 32 राहणार पुणे. असून तो बाणेरच्या एका आयटी कंपनीत कामाला होता. दरम्यान लाइन्स टायगर पॉईंट वर त्याची दुचाकी दिसून आली आहे. दरम्यान त्याने त्याच्या मित्राला मी आत्महत्या करतो असा एसएमएस आणि मेल पण केला.

या घटनेची लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लोणावळा टायगर पॉईंट वर चौकशी करण्यास सुरुवात केली. शिवदुर्ग टीमला प्रचार करून जवळजवळ अडीचशे फूट दरीत त्याचा मृतदेह आढळला. मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टम साठी आल्यात पाठवण्यात आलेला आहे. अधिक तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com