Kolhapur : कळंब कारागृहात रक्तरंजित थरार, आरोपीकडून २ पोलिसांवर हल्ला, नेमकं कारण काय?

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्याने दोन पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. इम्रान शेखविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही पोलिस जखमी झाले आहेत.
Kolhapur : कळंब कारागृहात रक्तरंजित थरार, आरोपीकडून २ पोलिसांवर हल्ला,  नेमकं कारण काय?
Kolhapur Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्याने दोन पोलिसांवर हल्ला केला

  • व्हिडिओ सुनावणीपूर्वी थांबायला सांगितल्याने रागात हल्ला केला

  • संभाजी कामले व विलास पारसे हे पोलिस जखमी

  • जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कोल्हापूरमध्ये रक्षणकर्त्या पोलिसावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स रुममधून बाहेर जाण्यास सांगितल्याच्या रागातून कळंबा कारागृहातील दोन पोलिसांवर कैद्यांनी हल्ला केला. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी मोकातील आरोपी इम्रान शमशुद्दीन शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी बाबूराव कामले व विलास उत्तम पारसे, अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. मोकातील आरोपी शेख हा वर्षभरापासून कळंबा कारागृहात आहे. आज त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती. साडेअकराच्या सुमारास तो सुनावणीसाठी कॉन्फरन्स खोलीसमोर आला. यावेळी इतर काही जणांची सुनावणी सुरू असल्याने त्याला थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आले होते.

Kolhapur : कळंब कारागृहात रक्तरंजित थरार, आरोपीकडून २ पोलिसांवर हल्ला,  नेमकं कारण काय?
Shocking : अर्धनग्न असताना रूमचा दरवाजा उघडला, प्रसिद्ध हॉटेलमध्ये स्पा थेरपी सुरू असताना परदेशी महिलेसोबत भयंकर घडलं

पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबायला सांगितले याचा राग आल्याने शेखने पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ड्युटीवर असलेले संभाजी कामले व विलास पारसे हे त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यातूनच त्याने कामले यांना मारहाण सुरू केली.

Kolhapur : कळंब कारागृहात रक्तरंजित थरार, आरोपीकडून २ पोलिसांवर हल्ला,  नेमकं कारण काय?
HSRP Number Plate : तुम्ही कार किंवा बाईकला लावलेली HSRP नंबर प्लेट बोगस तर नाही ना? ही बातमी वाचून 440 व्होल्टचा झटका बसेल!

याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात इमरान शेख वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांवर कैद्यांनी हल्ला करणं ही घटना नवीन नाही. परंतु रक्षणकर्त्यावर कैद्यांकडून होणारा हल्ला ही बाबा गंभीर आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com