Manasvi Choudhary
घोरणे बंद करण्यासाठी काही प्रभावी आणि नैसर्गिक घरगुती उपाय या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपा यामुळे श्वास घेण्यास अडथळा येणार नाही आणि घोरणे बंद होईल.
झोपताना डोक्याखाली जाड उशी घ्या यामुळे हवेचा मार्ग मोकळा राहतो आणि घोरणे कमी होते.
रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्या. जे घशातील सूज कमी करण्यास आणि मार्ग मोकळा करण्यास मदत करतात.
झोपण्यापूर्वी गरम पाण्याच्या वाफेत पुदिना तेलाचे २-३ थेंब टाका आणि वाफ घ्या. यामुळे नाकातील मार्ग मोकळा होईल.
जास्त वजन असलेल्या लोकांच्या घशाभोवती चरबीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हवेचा मार्ग अरुंद होतो.
झोपण्यापूर्वी किमान ४-५ तास आधी मद्यपान टाळा. अल्कोहोलमुळे घशातील स्नायू जास्त शिथिल होतात, ज्यामुळे घोरणे वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.