Accident News : भरधाव कारने ६ जणांना चिरडलं, चिमुकल्याचा जागीच मृत्यू; ५ गंभीर जखमी, अपघाताचा थरारक VIDEO

Lucknow Accident News : लखनऊमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याने वेगवान कार चालवत सहा जणांना चिरडले. या अपघातात सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Accident News : भरधाव कारने ६ जणांना चिरडलं, चिमुकल्याचा जागीच मृत्यू;  ५ गंभीर जखमी, अपघाताचा थरारक VIDEO
Lucknow Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • लखनऊमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याच्या कारने सहा जणांना चिरडले

  • सहा वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

  • पाच जण गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

  • पोलिसांकडून अपघाताचा सखोल तपास सुरू

कानपूरमधील हिट अँड रनची बातमी ताजी असतानाच लखनऊमध्ये एका बारावीच्या विद्यार्थ्याने त्याच्या कारने सहा जणांना चिरडले असल्याची बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी बांथरा पोलिस स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी पोलीस सविस्तर तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बांथरा शहरातील कानपूर रोडवरील हनुमान मंदिराजवळ हा अपघात झाला. १२ वीतील काही विद्यार्थी फेरवेल पार्टी करून एका कारने घरी परतत होते. ही कार बारावीतील विद्यार्थी चालवत होता. यावेळेस कारमध्ये एका मुलगी देखील होती.

Accident News : भरधाव कारने ६ जणांना चिरडलं, चिमुकल्याचा जागीच मृत्यू;  ५ गंभीर जखमी, अपघाताचा थरारक VIDEO
HSRP Number Plate : तुम्ही कार किंवा बाईकला लावलेली HSRP नंबर प्लेट बोगस तर नाही ना? ही बातमी वाचून 440 व्होल्टचा झटका बसेल!

या वेगाने येणाऱ्या कारने प्रथम एका ऑटो-रिक्षाला धडक दिली आणि नंतर पादचाऱ्यांना चिरडले. घटनेनंतर विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या अपघातात अरमान (१२ वर्ष), अवध बिहारी (४२ वर्ष), साधना वर्मा (३५ वर्ष), मीना देवी (६० वर्ष) आणि दीक्षांत पटेल (६ वर्ष) हे गंभीर जखमी झाले.

सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा वर्षांच्या दीक्षांत पटेलची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला उच्च रुग्णालयात रेफर करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com