Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?

Lohagad Fort crime scene recreation details: लोहगड किल्ल्यावरून ढकलून सिया आणि चेतनने केतनची हत्या केली होती. पोलिसांनी आज पहाटे दोन्ही आरोपींना घटनास्थळावर नेऊन रिक्रिएशन केले.
Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?
KETAN AGRAWAL MURDER CASE: Saam Tv
Published On
  • पुणे केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट

  • पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगडावर सीन रिक्रिएशन केले

  • आरोपी सिया गोयलला घटनास्थळी नेण्यात आले होते

  • डमी बॉडी वापरून घटनाक्रम पुन्हा तयार करण्यात आला

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती उघड होत आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आरोपी सिया आणि चेतनची चौकशी सुरू असून त्यामधून धक्कादायक खुलासे होत आहे. शनिवारी पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांची १२ तास चौकशी केली. आता या प्रकरणात पोलिसांनी लोहगडावर जाऊन सीन रिक्रिएशन सुरू केले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सियाला लोहगडावर नेलं. ज्याठिकाणाहून सियानं केतनला गडावरून ढकलून दिलं त्याच ठिकाणी सियाला पोलिसांनी नेलं होतं अशी माहिती समोर आली आहे. केतनला नक्की कसं ढकललं? घटनास्थळी नक्की काय झालं? याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सिया गोयलकडून घटनेचे सीन रिक्रिएशन केले. सीन रिक्रिएशनच्या पूर्ण प्रक्रियेची माहिती सामच्या हाती लागली आहे. केतन अग्रवालला लोहगडावर जिथून धक्का देण्यात आला त्या पॉइंटला सियाला नेऊन घटनेचा सीन रिक्रिएट करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल हे देखील यावेळी उपस्थित होते.

Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?
Ketan Agarwal Case: सियाच्या आई-वडिलांची कसून चौकशी, पोलिसांनी विचारलेले ९ प्रश्न कोणते?

शनिवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनेचे सीन रिक्रिएशन करण्याचा निर्णय घेतला. काल दुपारी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पुणे ग्रामीण पोलिसांनी कसून चौकशी केली. लोहगड किल्ल्यावरील त्या पॉइंटबाबत पोलिसांनी दोघांकडून माहिती घेतली. आज पहाटे ५ वाजता पुणे ग्रामीण पोलिस सियाला घेऊन लोहगड किल्ल्यावर निघाले. यावेळी सिया गोयलने लोहगड किल्ल्यावर कुठल्या मार्गाचा वापर केला ते देखील पोलिसांना दाखवलं.

Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?
Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

या प्रक्रियेसाठी स्वतः पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून गुन्हा नेमका कसा घडला? हे समजून घेण्यासाठी दोन्ही आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले. यावेळी घटनास्थळी हुबेहूब तसाच प्रसंग तयार करण्यात आला. घटनेत मृत्यू झालेल्या केतन अग्रवालसारखी दिसणाऱ्या व्यक्ती ची डमी बॉडी या ठिकाणी आणण्यात आली होती. ज्या ठिकाणी घटना घडली तिथे पोलिसांनी सियाला ती डमी बॉडी खाली ढकलायला सांगितली. सीन रिक्रिएशनबाबतची प्रत्येक नोंद पुणे ग्रामीण पोलिसांनी नोंदवली आहे.

Ketan Agarwal Case: लोहगडावर पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, केतनला ढकललं त्याठिकाणी सियाला नेण्यात आलं; नेमकं काय घडलं?
Ketan Agarwal Case: 'लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं', सियाची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com