Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

Pune Crime News: पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची त्याची होणारी बायको सिया गोयलने बॉयफ्रेंड चेतन चौधरीसोबत मिळून हत्या केली.
Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?
Ketan Agarwal CaseSaam Tv
Published On
  • सिया आणि चेतनच्या ४ चुकांमुळे हत्येचा उलगडा

  • सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड हे महत्त्वाचे पुरावे ठरले

  • चेतनचा नोकर महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकतो

  • एसआयटी तपासामुळे प्रकरण आणखी मजबूत होत आहे

सुप्रिम मसकर, साम टीव्ही

केतनच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आलाय. केतनच्या हत्येसासाठी सिया आणि चेतनं कसा प्लॅन रचला आणि प्लॅन रचताना नेमक्या कशा चुका झालाय. चेतनच्या नोकरामुळे आरोपींना कशी शिक्षा होणार आहे? पाहूय़ात या स्पेशल रिपोर्टमधून...

पुण्याच्या लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येतायत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हाय-प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचा तपास आता अंतिमात टप्प्यात पोहचलाय. यात सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीच्या तीन चुकांमुळे या हत्येचा उलगडा झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे या दोघांच्या गळ्याभोवती कायद्याचा फास आणकी आवळला जाणार आहे. या प्रकरणात तपासाची चक्रे वेगवान फिरलीयत. मात्र या सिया आणि चेतनच्या कोणत्या चार चुकांमुळे या हत्येचा उलगडा झालाय. ते पाहूयात...

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?
Pune Crime: बिल्डर अग्रवाल यांच्या मुलाच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सिया आणि चेतननं 14 जूनलाच आखला होता कट

पहिली चूक

18 जूनला केतनच्या मृत्यूनंतर सिया जेव्हा त्याच्या घरी गेली, तेव्हा केतनच्या बहिणीने 'तो कसा पडला?' असे विचारलं. यावर सियाला स्पष्ट उत्तर देता आले नाही आणि ती घाबरली. बहिणीनं वडील विशाल अग्रवाल यांना सांगितले की, हा अपघात असू शकत नाही, सिया काहीतरी लपवतेय'. ज्यानंतर विशाल अग्रवाल यांनी तातडीने पुणे पोलिसांत धाव घेतली.

दुसरी चूक

लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना धक्का बसला. भर उन्हाळ्यात, कडक उन्हात एक मुलगा संपूर्ण चेहरा लपवण्यासाठी 'हुडी' घालून केतन आणि सियाच्या अवतीभवती फिरत होता. तोच सियाचा प्रियकर चेतन चौधरी असल्याचं पोलिसांच्या तपासत समोर आलं...आणि सियावरचा संशय वाढला.

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?
Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

तिसरी चूक

पोलिसांनी सियाच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली असता, जानेवारी महिन्यापासून हत्येच्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत सियानं एकाच नंबरवर 2004 वेळा कॉल केले होते. दोघांमध्ये तब्बल 238 तास संभाषण झाले होते. हा नंबर तिचा प्रियकर चेतन चौधरीचा होता.

चौथी चूक

चेतन चौधरी लोहगडावर जाताना स्वत:चा मोबाईल घरी ठेवून घरातील नोकराचा फोन घेऊन गेला... ज्यामुळे घातपाताची शक्यता असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?
Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

दरम्यान आता याप्रकरणात SIT स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसचं ज्या कॅफेत बसून सिया आणि चेतननं हत्येचा कट रचला तो सीसीटिव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलाय. चौकशीनंतर सिया गोयल लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती आणि कुटुंबाच्या दबावामुळे केतनशी लग्नाला तयार झाल्याचं समोर आलयं. त्यामुळे लग्नासाठीचा दबाव हा हत्येमागील संभाव्य कारणांपैकी एक कारण असू शकतं. त्यात सिय़ा साखरपुडा मोडून पळून जाण्याच्या तयारीत होती.

मात्र कुटुंबियांची बदनामी होऊ नये, यासाठी सिया प्रियकरासोबत पळून गेली नसल्य़ाचंही समोर आलयं. मात्र तिनं थेट केतना आपल्या मार्गातून क्रूरपणे हटवलं. आता आरोपी चेतन चौधरीचा नोकर माफीचा साक्षीदार होणार असल्यामुळे आणि तांत्रिक पुराव्यांचे जाळे घट्ट झाल्यामुळे, सिया आणि चेतनला फाशीची शिक्षा होणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलयं.

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?
Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com